Published by: Ournashik.com
Date: 18-03-2022
भारताची व्यापारी निर्यात १४ मार्चपर्यंत जवळजवळ ३९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ती नक्कीच ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल अस केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आज म्हणाले.
नवी दिल्ली येथे ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA) द्वारे आयोजित आत्मनिर्भर उत्कृष्टता पुरस्कार सोहळा आणि ७ व्या तंत्रज्ञान शिखर परिषदेला गोयल संबोधित करत होते. भारतातील वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योगाने प्रथमच ६०० दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या अतिरिक्त व्यापाराची नोंद केली आहे अशी त्यांनी सांगितल.
भारताचा स्वयंचिलत वाहन उद्योग १०० अब्जडॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये ८ टक्के वाटा आहे आणि भारताच्या जीडीपी मध्ये त्याचा २ पूर्णांक ३ दशांश टक्के वाटा आहे आणि २०२५ पर्यंत तो जगातील ३रा सर्वात मोठा उद्योग बनणार आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.
कोविड-१९ ची आव्हाने, कंटेनरचा तुटवडा, चिपचा तुटवडा, कमोडिटीच्या किमती आणि संघर्ष अशा पाच प्रकारच्या कठीण आव्हानांना न जुमानता उद्योग सुरू ठेवल्याबद्दल आणि तशा विपरीत परिस्थितीला तोंड देत, समायोजन करत विकसित झालेल्या वाहन उद्योगातील उद्योजकांचे त्यांनी कौतुक केले.
राज्यात कोविड-१९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २ हजाराच्या खाली
आकाशवाणी
महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या आता दोन हजाराच्या खाली आली आहे. राज्यात आज २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली, ३९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७२ हजार ३२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २२ हजार ३६० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४३ हजार ७६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ हजार ९०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १ दशांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.
होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
Twitter
देशभरात आज होळीचा सण सर्वत्र साजरा होत आहे. कोविड नियमांचं पालन करुन होळी आणि उद्याचा धुलिवंदनाचा सण साजरा करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
होलिका दहन म्हणजे वाईट प्रवृत्तीवर सतप्रवृत्तीच्या विजयाचं प्रतिक आहे, असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह साजरा केला जाणारा रंगांचा सण होळी सर्वांच्या जीवनात शांतता समृद्धी तसंच आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छा नायडू यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात होलिकोत्सव उत्साहात साजरा होत आहे.
औरंगाबाद शहरात गुलमंडी इथं सामाजिक उपक्रमाद्वारे आज होलीका दहनाचं आयोजन केलं आहे. यावेळी अनाथ बालकांसमवेत उत्सव साजरा केला जाणार आहे. दुपारी चार ते रात्री दहा यावेळेत मान्यवरांच्या हस्ते होलिका दहन केलं जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ५३९ ठिकाणी सार्वजिनक आणि ५८८ ठिकाणी खासगीरित्या होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. तर मानपानावरून वाद असलेल्या पाच गावात होलिकोत्सवाला बंदी आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १२७ ठिकाणी होळी साजरी होत आहे.
शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पथक तैनात केली आहेत. पोलीस प्रशासनानं ही माहिती दिली. जिल्ह्यात दीड, पाच, सात, पंधरा दिवस होलिकोत्सव
साजरा केला जातो. होळी उत्सवात रासायनिक रंगांचा वापर करतात. मात्र त्याचे मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होतात, याबाबत जनजागृती करण्यासाठी गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फूलसुगे या तरुणीनं सेव नेचर, सेव ट्री, सेव पीपल, या संकल्पनेवर रांगोळी साकारली आहे. वृक्षांची होणारी कत्तल थांबवून, होळीत जाळण्यासाठी परिसरातला केरकचरा गोळा करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशही या रांगोळीतून दिला आहे. परभणी शहरातील जुना पेडगाव रोड आणि वसमत रोडवरच्या बालगृहातील अनाथ मुलांना रंगपंचमी साजरी करता यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं नैसर्गिक कोरड्या रंगाचं वाटप केलं आहे. धुळ्यात आज होळीचा सण साजरा करण्यासाठी चौका चौकात पाण्याचे हौद ठेवण्यात आले आहेत. सुमारे ३०० मित्र मंडळांना होळीसाठी परवानगी मिळाली आहे. होळीसाठी पेालिसांनी डीजे वाजवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. होळी पेटवण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत तसंच उद्या धुलिवंदनच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डिजे, लाऊडस्पिकर वाजवण्यास परवानगी दिली आहे. धुळे महापालिकेत आज सकाळी होळी उत्साहात साजरी झाली. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थाळनाच्या वतीनं श्री गुरुस्था न मंदिरासमोर होळी पेटवण्याेत आली.
होळीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा इथं अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या लेंगी महोत्सवात एकाहून एक नृत्य सादर होत आहेत. काशी पोहरागड इथं महंत कबीरदास यांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरू आहे. बंजारा समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तांड्या तांड्यावर सध्या लेंगी नृत्य सादर होत आहे. लेंगी गीतातून विविध सामाजिक प्रश्नांविषयी जागृती करण्यात येते.रंगामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा, तसंच रंग खेळायला सुरुवात करण्यापूर्वी शरीरावर खोबऱ्याचं तेल लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार ४७ अंकांची वाढ
आकाशवाणी
रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या शांतीचर्चेत प्रगतीची चिन्हं दिसू लागल्यामुळे, तसंच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात झालेल्या अपेक्षित वाढीमुळे आज जागतिक शेअर बाजारात तेजीचं वातावरण राहिलं.
त्याचे पडसाद देशातल्या शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवसअखेर १ हजार ४७ अंकांची वाढ झाली आणि तो ५७ हजार ८०० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३१२ अंकांनी वधारून १७ हजार २८७ अंकांवर बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल मध्यवर्ती बँकेचे व्याजदर अपेक्षित पातळीप्रमाणे वाढल्यामुळेही वातावरणात उत्साह दिसून आला.
Source and credit: AIR News