Today's news

Today's news

Today's nashik news 

वार : सोमवार ,तिथी दशमी, पक्ष: कृष्ण नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी महिना : मार्गशीर्ष शक :१९४३, विक्रम संवसर २०७८,

.......................

कोरोनाबाबतचे नवे नियम व्यापार वर्गास तोट्याचे : दुकानात विनामास्क ग्राहक आढल्यास १००००हजारांचा दंड

नाशिक :  कोरोनाबाबतचे नियम प्रशासनाने अधिक कठोर केले असून त्याचा फटका व्यापारी वर्गास बसत आहे. आता यापुढे कोणत्याही दुकानात विनामास्क ग्राहक आढळुन आल्यास ग्राहकास नव्हे तर संबधित दुकानदारास रुपये १०००० चा दंड भरावा लागणार आहे ,दरम्यान व्यापारी वर्गाने या नियमाला कडाडून विरोध केला असून आम्ही कोणताही दंड भरणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पेट्रोल पंपावर आता पोलीस नाहीत , विना हेल्मेटवर असणार सी सी टी टीव्ही  नजर 

नाशिकमध्ये दुचाकी चालकांना शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मागील काही दिवसांपूर्वी नो हेल्मेट नो पेट्रोल असे आदेश काढत पेट्रोल पंप चालकांना विना हेल्मेट असणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल न देण्याचे सुचना केल्या होत्या दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी शहरांतील पेट्रोल चालकांनी केली होती .या पंपावर एक  पोलीस कर्मचारी रोज असायचा मात्र आता पोलीस नसून केवळ सीसी टिव्ही कॅमेरे या विना हेल्मेट लोकावर लक्ष ठेवणार आहेत

ज्योतिष खरे की खोटे याविषयी अंनिसचे व्याख्यान 

नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फ़े १ डिसेंबर २०२१रोजी ज्योतिष खरे कीं खोटे या विषयावर अंनिसचे अकोला येथील सदस्य शरद वानखेडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. नाशिक येथील गंगापूर रोड येथे कुसुमाग्रज स्मारकात हे व्याखान होणार आहे.

थंडीचा जोर वाढला

नाशिक शहर व जिल्हा परिसरात मागील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढला आहे रब्बी पिकांना हे वातावरण पोषक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.