Today 's news headlines
आजचे पंचांग , मंगळवार, दि .३०/११/२०२१, तिथी एकादशी, पक्ष कृष्ण, नक्षत्र, हस्त, मास :कार्तिक, शके १९४३, विक्रम संवसर २०७८
दिनविशेष : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधि सोहळा, आळंदी, उत्पप्ती एकादशी
............
राष्ट्रीय : ओमीक्रोनमुळे प्रवासावर बंधने
नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट ओमीक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांना आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सुचना लागू केल्या आहेत.कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही निगेटिव्ह आर टी पी सी आर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या शाळा १० डिसेंबरनंतर
नाशिक : कोरोनाचा नवा विषाणू रोखण्यासाठी नाशिक महापालिका ऍक्शन मोडवर आली असून दक्षिण आफ्रिकेतुन गेल्या शुक्रवारी नाशिक मध्ये दाखल झालेल्या दोन खेळाडू आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी केली मात्र त्या निगेटिव्ह आल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान महापालिका हद्दीतील शाळा ज्या १डिसेंबर पासून सुरू होणार होत्या त्या आता १० डिसेंबर ला सुरू होणार आहेत
नाशिक विभागातील एस टी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार
मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या एस टी चा संप मिटण्याची कोणतीही चिन्हें दिसत नसून त्याउलट एस टी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची तयारी नाशिक विभागात दिसून येत आहे. संपात सहभागी 25 कर्मचाऱ्यांना सलग तिसऱ्या दिवशी नोटीसा देण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात प्रतिदिन सहा हजार लसीकरण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोना लसीकरण करण्यासाठी महापालिकेने एक ठराविक उद्दिष्ट समोर ठेवले आहे. नव्याने आढळून आलेल्या ओमीक्रोन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरनाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रतिदिन सहा हजार लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपा च्या आरोग्य विभागाने दिली आहे.
ओमीक्रॉनच्या धास्तीने ९८३ कोरोनायोध्याना दोन महिने मुदतवाढ
कोरोनाचा संसर्ग कसाबसा नियंत्रणात येतो न येतो तोच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमीक्रोन विषाणूचा प्रसार वेगात होतो आहे.ही परिस्थिती लक्षात घेता नाशिक महापालिकेने सुमारे९८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तयारी अंतीम टप्यात
नाशिक येथे होऊ घातलेल्या दि ३ ४ व ५ डिसेंबर रोजीच्या ९४व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.संमेलनस्थळास कुसुमाग्रज नगरी असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाची निमंत्रण पत्रिका, स्वागत गीत विविध समित्या आदी कामांची विभागणी झाली आहे.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे डॉ.गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन
नाशिक येथे होऊ घातलेल्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मविप्र च्या केटी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ व्ही बी गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक दरेकर, प्राचार्य संजय कोलगे, जयंत खडतले, राजू देसले, शशी उन्हवणे आदी उपस्थित होते.
,शिवशाही बसवर दगडफेक
पुण्याहून नाशिककडे येत असलेल्या खासगी शिवशाही बसवर खेड शिवारात दगडफेक करण्यात आली. एस टी च्या सुरू असलेल्या संपाने आक्रमक रूप धारण केल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे यात कुणालाही ईजा झाली नाही.
आजचे राशिभविष्य मंगळवार दि ३.११.२०२१
मेष : कामाचा ताण जाणवेल अनावश्यक गोष्टींत वेळ वाया घालू नका
वृषभ : कुटुंबाला वेळ द्याल, संतति सौख्य लाभेल,हितशत्रूपासून वेळीच सावध रहा
मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल, प्रवासाचे योग येतील .जिद्द व चिकाटी वाढवा
कर्क : चिकाटी वाढणार आहे आत्मविश्वास वाढून कामाची व्याप्ती वाढणार आहे.
सिंह : अचानक धनलाभ संभवतो, महत्त्वाचे कामे पूर्ण होतील
कन्या ; कामात यश लाभेल, घाईत निर्णय घेऊ नका
तूळ : पत्नीकडून जाच होईल, कुटुंबात कटुता समभवते काळजी घ्या, रामरक्षा स्तोत्रं वाचा
,वृश्चिक : आरोग्य समस्या जाणवतील, विशेषतः पोटाच्या समस्या , काळजी घेऊन उपचार करा
धनु: प्रवासाचे योग आहेत पण वाहने नीट चालवा
मकर ; रखडलेले काम पूर्ण होइल
कुंभ : मनाविरुद्ध घटना घडतील सावधानता बाळगा
मीन : आरोग्य उत्तम राहील