Today's news
happy new year 2022 , satarday, 1jan.2022 शनिवार १जानेवारी २०२२
जानेवारीत राज्यात २ लाख रुग्ण व ८० हजार जणांचे मृत्य होण्याची सरकारला भीती
मुंबई : राज्यात कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ही संख्या २ लाखाच्या घरात जाईल व त्यामुळे एक टक्का मृत्यू गृहीत धरले तरी तो आकडा ८० हजाराच्या घरात जाईल अशी भीती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील जनतेने बेफिकिरी दाखवली तर ८० हजार मृत्यू १५ दिवसात होतील अशीही भीतीदायक माहिती व्यास यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद
नाशिक : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी (ता.३१) कोरोना बधितांचा आकडा महिनाभरात पुन्हा शंभरीपार पोहचून १३३वर गेला आहे. आठवडाभर साधारणपणे पन्नासच्या आसपास राहणारे बाधित रुग्ण बुधवारी ७३,गुरुवारी ८२ तर शुक्रवारी थेट १३३ अशा तऱ्हेने वाढले आहेत.
लॉक डाऊन चे अधिकार राज्य सरकारला
नाशिक : ओमयक्रॉन पसरण्याचा वेग अधिक असल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या व ओमायक्रॉन च्या साथीची परिस्थिती वेगळी असून काळजी घेणे गरजेचे आहे तसेच राज्यातील रुग्ण संख्येच्या प्रमाणावरून त्या त्या राज्यातील सरकारला लॉक डाऊन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत अशी माहीती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली.
नाशिकच्या मिथिलाला चार सुवर्णपदके
नाशिक : तुर्की येथील इस्तंबूल येथे २४ ते ३० डिसेंबरदरम्यान झालेल्या २०२१आशियायी क्लासिक आणि पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत भारताकडून नाशिकच्या डॉ मिथिला चव्हाण यांनी चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवून स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं आहे.
हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी
नाशिक ; हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली या घरफोडीत चोरट्यानि घरात ठेवलले ७ ,लाख १५ हजार किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व १५ हजारांची रोकड असा एकूण ७ लाख ३० हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली दरम्यान पंचवटी पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.