Today,s nashik news
सोमवार दि २७/१२/२०२१
चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, अपहरणकरती महिला पोलिसांच्या ताब्यात
नाशिक दि :२७ हावडा-मुंबई एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तीन वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न सर्वेश यादव नामक रेल्वे गार्डच्या सतर्कमुळे मुलीचे अपहरण टळले, दरम्यान यादव यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीवर गार्डची ड्युटी करून गार्ड सर्वेश यादव हे न्याय डोंगरी रेल्वे स्थानकावर उतरले होते. फलाटावर उभे असताना स्टार्टर सिग्नल फेल झाल्यामुळे गाड्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. त्याचवेळी स्थानकावर थांबलेल्या हावडा मुंबई एक्सप्रेस मधून एक महिला तीन वर्षीय मुलीला घेऊन खाली उतरली. बाजूला उभ्या असलेल्या सचखंड एक्सप्रेस मध्ये ही महिला जाऊन बसली.गाडीने स्थानक सोडले असता जगलाल पारो ( ३७) हे प्रवास करत असताना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती यादव याना मिळाली. त्यांनी ही माहिती मनमाड नांदगाव येथील वरिष्ठ अधिकार्यांना देऊन गाडी आणि डब्याचे लोकेशन कळवत महिलेचा फोटो पाठवला. रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बल जवानांनी सापळा रचत अपहरण कर्त्या महिलेला ताब्यात घेतले व मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
पुन्हा गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांची धाकधुक वाढली
मुंबई ; अवकाळी पाऊस अधूनमधून डोके वर काढतच असून त्याचा फटका शेतकरी वर्गास बसत असून रब्बीच्या पिकावर त्याचा परिणाम होत आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने कांदा ,सोयाबीन द्राक्षे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यातून सावरतो न सावरतो तोच आता उद्या ( ता 28 ते 29 ) रोजी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह गारपिटीच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
खड्य्यात पडून युवकाचा बळी, सिडकोतील घटना
नाशिक : अंबड लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाला सदर हॉटेलचे नूतनीकरण सुरू असल्याने त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदला होता.या खड्याचा अंदाज न आल्याने त्यात तोल जाऊन युवक पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. युवकाचा अकस्मात मृत्यूने सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चांदशी येथील हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा ; पाच जण अटकेत
नाशिक : शहरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या चांदशी येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही युवक युवतींनी हुक्का पार्टी रंगवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चांदशी गावाकडे आपला मोर्चा वळविला. विना परवाना सुरू असलेल्या या पार्टीत सुमारे 24 युवक युवती कडून सर्रास पणे मद्यपान व हुक्का सेवन सुरू होते दरम्यान जागेचे मालक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
Our nashik jobs today
स्वच्छता निरीक्षक कोर्स , ( शासनमान्य) पात्रता १२ वी पास sc साठी शिष्यवृत्ती मोबा- 0253-2351071/72
मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट साठी ऑफिस कामाकरिता मुले पाहिजेत वय १८-ते ३० राहणे व जेवण मोफत पगार सात ते चोवीस हजार : मोबा : 9307875205
Req. experience/ fresh/ DME/ आयटीआय V M C operiter ,supervisior ; mob 0253- 2950333
माऊली लान्स शेजारी कामटवाडा येथे पेट्रोल पंपावर कामासाठी मुले मुली पाहिजे मोबा 7030203293
ऑफिस टेलिकॉलिंग साठी मुली व महिला पाहिजेत ; शिक्षण 12 वि ते पदवीधर मोबाईल : 7841958559