Today's news
वार : मंगळवार, दि ०७/ १२/ २०२१ शके १९४२ विक्रम संवसर, २०७८ तिथी चतुर्थी, नक्षत्र : उत्तरा षाढा ,विनायक चतुर्थी
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणास स्थगिती
नवी दिल्ली : महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थात इतर मागासवर्गीयांंना ( ओबीसी ) २७ % आरक्षण प्रदान महाराष्ट्र सरकारच्या अध्यदेशास सर्व्वोच न्यायालयाने सोमवारी ( ,ता ०६) स्थगििती दिली आहे .
शाळांवर कुठलेही निर्बंध नाहीत, शाळा सुरू करा : टोपे
ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना त्याची काळजी घेणे गरजेचे आहे मात्र तूर्तास तरी राज्यातील शाळा बंद करण्याचा किंवा त्यावर काही निर्बध लादण्याचा कोणताही विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप : मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे मान्यवरांचे आवाहन
नाशिक ( कुसुमाग्रज नगरी) : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेलें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नुकताच समारोप झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भाषणाने संमेलनाची सांगता झाली.मराठी भाषा भविष्यात अभिजात बनवायची असेल तर सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी श्री पवार यांनी केले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
नाशिक: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी ' ब ' वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला. महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला असून तसा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर २२०० ऑक्सिजन बेड तयार : महापालिका सतर्क
नाशिक : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका सतर्क झाली असून महापालिकेने कोविड सेंटर मध्ये ३३०० बेड सज्ज केले असून २२०० खाटाना ऑक्सिजनची सुविधा दिली आहे.
जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द
नाशिक : डिसेंबर महिन्यातील चंपाषष्ठी निमित्त तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणारे कुलदैवत खंडेराव महाराज यांचे यात्रोत्सव कोरोना तसेच ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यात ओझर, वडाळीभोई, वडनेर भैरव भोयेगाव आदी ठिकाणी हा यात्रोत्सव मोठया प्रमाणात आयोजित करण्यात येतो.मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदाही तो रद्द करण्यात आला आहे दरम्यान तसे शासन निर्णय परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केले आहे.
बाबरी मशीद स्मृती दिनी सामूहिक नमाज अदा
नाशिक : बाबरी मशीद स्मृती दिनानिमित्त काल ( ता ६) जुने नाशिक परिसरात शहरातील सर्वच मशिदीत सामूहिक अजाण देण्यात आली. देशाच्या शांततेसाठी विशेष दुवा पठण करण्यात आली. अतिरेकी घटनांचा निषेध करून सर्वधर्मीय लोकांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.