Today's news
वार : गुरुवार दि ०९/१२/२०२१ मार्गशीर्ष शुद्ध १९ शके १९४२, विक्रम २०८७ तिथी षष्ठी , चंद्र नक्षत्र धनिष्ठा , दिनविशेष : चंपाषष्ठी
भारतीय लष्कराचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, :पत्नीसह ११जण ठार
नवी दिल्ली : सुरक्षा दलाप्रमाणेच अवघ्या देशासाठी आजचा दिवस मोठा धक्कादायक ठरला.सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि अन्य काही सहकारी जणांना घेऊन जाणारे हवाई दलाचे एमआय- १७- व्ही ५ हे हेलिकॉप्टर दुपारी साडेबाराच्या सुमारास तामिळनाडूतील कुन्नरजवळील घनदाट जंगलात कोसळले. या भीषण अपघातात जनरल रावत वय ( ६३) त्यांच्या पत्नी मधूलिका रावत यांच्यासह अन्य ११जणांचा मृत्यू झाला. दरम्यान रावत त्यांच्या निधनाने एक कर्तबगार अधिकारी भारताने गमावला असल्याची खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथसिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आदींनी व्यक्त केली. आज दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्यात पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज
नाशिक : पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे गुरुवार ता.९ ,नंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल. ,थंडी, धुके, पाऊस, अन पावसाबरोबर गारा कोसळतील तसेच दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यासह महाराष्ट्रत देखील गारपीट होऊ शकते असा अंदाज भौतिकशास्त्रचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक विभागातून तीस बसगाड्या धावल्या
नाशिक : एस.टी.कर्मचारी संपाचे पडसाद अजूनही कायम असून नाशिक विभागातील आणखी दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.मात्र काही आगरातून तुरळक प्रमाणात बस सोडल्या जात आहे. बुधवारी नाशिक विभागातून सात आगरातून एकूण तीस बसगाड्या सोडण्यात आल्या.सीबीएस बसस्थाकातून पुणे, धुळे, डोंबिवली व औरंगाबादसाठी खासगी शिवशाही सोडल्या जात आहेत. नाशिक आगरातून एकूण१८ गाड्या सुटल्या.
जिल्ह्यात ४६ पॉझिटिव्ह, ४० कोरोनामुक्त
नाशिक ; जिल्ह्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना बधितांच्या संख्येत चढ उतार सुरू असून बुधवारी ( ता ८ ) ४६ रुग्णाचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चाळीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली.
आज चंपाषष्ठीमुळे कुलदैवत खंडोबाचे पूजन
नाशिक : आज गुरुवारी (ता ९ ) चंपाषष्ठी च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गंगाघाटावरील प्राचीन खंडेराव मंदिर सजविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रोत्सव जरी बंद असले तरी घरोघरी आज खंडोबाची आरती ,केली जाते व नैवेद्य दाखवला जातो .
राज्यस्तरीय खो- खो स्पर्धेसाठी नाशिकच्या खेळाडूंची निवड
नाशिक: सोलापूर येथे शनिवारी ( ता ११) रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाचे नेतृत्व वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता दिलीप खांडवी करणार आहे. महिला संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी कोशल्या पवार हिच्यावर सोपवली आहे.
राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
नाशिक ; संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंती नाशिक शहरासह जिल्हाभर सर्वत्र साजरी करण्यात आली.सिडको, सातपूर, तसेच इगतपुरी आदी भागात जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.