Today's news
शनिवार दि ११ डिसेंबर २०२१
वार : शनिवार, मिति मार्गशीर्ष शुक्ल शके १९४३ , शनिवार दि ११ डिसेंबर २०२१ विक्रम संवसर २०७८
रावत दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : १७ तोफांची दिली मानवंदना
नवी दिल्ली ; भारताचे पहिले संरक्षक दल प्रमुख बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधूलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या एका महान योध्यास आपण गमावले याची खंत उपस्थितांच्या शोकाकुल चेहऱ्यावर उमटत होती.फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये बिपीन रावत व मधूलिका यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून ठेवले होते. भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे, नौदलाचे प्रमुख आर हरी कुमार, रावत दाम्पत्याच्या दोन्ही कन्या कृतिका व तारिणी याना भावना आवरता आल्या नाहीत त्यामुळे सारे वातावरण हादरून गेले. गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान मोदी आदी नेत्यांनी रावत दाम्पत्यस आदरांजली वाहिली.
,( हसत हसत अलविदा करा .......)
या दुर्घटनेत मरण पावलेल्या ब्रिगेडियर लखविंदर सिंग लीडर यांच्या पत्नी गीतिका यांनी या वीरांना हसत हसत अलविदा करा मी एका वीर जवानाची पत्नी आहे अशा भावना व्यक्त केल्या
....................
आदिवासी विकास महामंडळ नोकर भरतीतील दोन बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
नाशिक : राज्यभर गाजलेल्या आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्त महामंडळ यातील ५८४ पदांसाठीच्या नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी सुमारे पाच वर्षांनंतर महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे ,चौकशी अधिकारी तथा अपर आयुक्त अशोक लोखंडे, आणि कुणाल आयटीचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
वाटेल तेव्हा अनुकंपा नोकरी मागता येत नाही : नागपूर खंडपीठ, उच्च न्यायालयायाचे मत
नागपूर : अकस्मात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे हा अनुकंपा नोकरीचा उद्देश आहे त्यामुळे वारसदारांना मनांत येईल तेव्हा या नोकरीची मागणी करता येत नाही नोकरी हवी असल्यास अर्ज करने व नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करणे आवश्यक आहे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हंटले आहे
एस टी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश , अन्यथा कारवाई
मुंबई : संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याच्या सूचना एस टी महामंडळ अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत. जे कर्मचारी आदेशाचे पालन करणार नाहीत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच जे कर्मचारी सोमवारपासून नियमितपणे कामावर हजर होतील त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असेही परब यांनी म्हंटले आहे.
आता पीएच डी प्रवेशासाठी नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट
अमरावती : केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून त्यानुसार राज्यातील १५ अकृषी विद्यापिठात सण २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांपासून आचार्य पदवी (पीएचडी) प्रवेश घ्यायचा असल्यास अगोदर नेट परिक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या गाईड लाईन मध्ये हे स्पष्ट केले आहे.
गुन्हेगारी विरोधात भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नाशिक ; नाशिक मध्ये वाढती गुन्हेगार, खून ,दरोडे, हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यावर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्र्यंबक रोडवरून इदगाह मैदान येथून मोर्चास सुरुवात झाली.या मोर्चात भाजप नेते व माजी मंत्री जयकुमार रावल महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे ,आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आदी सहभागी झाले होते.
नवश्या गणपती मंदिरासाठी २५ विश्वस्थ नियुक्त
नाशिक : आनंदवली येथील ऐतिहासिक देवस्थान असलेल्या नवश्या गणपती मंदिर विश्वस्त मंडळींचा वाद अखेर मिटला असून धर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी कडक भूमिका घेऊन २५ विश्वास्थानची नियुक्ती केली आहे.
दत्तगुरु जन्मोसव पर्वास प्रारंभ
नाशिक ; येत्या शनिवारी ( ता १८) पासून दत्त जयंती साजरी होणार असून त्यानिमित्ताने दत्त संप्रदाय वर्गात आनंदाचे वातावरण आहे दत्तगुरु यांच्या नवरात्रीस नाशिक मध्ये प्रारंभ झाला आहे