ournashik newsheadlines

ournashik newsheadlines

नाशिकमधील पालखेड डावा कालव्याच्या नूतनीकरणास 185 कोटी रुपये मंजूर; जागतिक बँकेच्या सिम्प कार्यक्रमात निवड

सिम्प या योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी पुरविण्यात येणार असून, पालखेड डावा कालवा व त्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व वितरण व्यवस्था तसेच ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 185 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या फायनान्स डिपार्टमेंट ने सहमती दिलेली आहे.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पालखेड डावा कालव्याच्या नूतनीकरणास 185 कोटी रुपये मंजू

नाशिकमध्ये गृहनिर्माण संस्थांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी विशेष मोहीम; कसा घ्याल लाभ?

राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विकासकाच्या नावे असलेल्या जमिनीची मालकी व हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

र करण्यात आले असून, जागतिक बँकेच्या सिम्प (SIMP) कार्यक्रमात राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात या कालव्याचा समावेश आहे. मंजूर निधीतून कालव्याच्या 0 ते 85 किलो मीटर लाभ क्षेत्रातील कालव्याचे अस्तारीकरण व विस्तारीकरण दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच ही कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. भुजबळ फार्म येथे जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी भुजबळांनी ही माहिती दिली. बैठकीला पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत टोपले, मिलिंद बागुल, व्ही. डी. बागुल, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर उपस्थित होते.

नाशिकः राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (Co-operative Housing Society) मानीव अभिहस्तांतरणासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान विशेष मोहीम (Special campaign) राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विकासकाच्या नावे असलेल्या जमिनीची मालकी व हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी बाकी आहे, अथवा विकासकाकडून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण झालेले नाही, त्या संस्थांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी केले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना अपार्टमेंट अॅक्ट 1970 अंतर्गत अपार्टमेंट मधील फ्लॅट व युनिट धारकांना देखील सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनशिप अॅक्ट अन्वये नोंदविण्यात आलेल्या अपार्टमेंट मधील सदनिका तसेच युनिट धारकांनी स्थावर मिळकतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

कुठे द्याल प्रस्ताव?

योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करुन गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाबतचे प्रस्ताव http://www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. तसेच सदर प्रस्तावाची मूळ प्रत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या कार्यालयास सादर करावी. प्राप्त प्रस्तावावर महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबतचा कायदा (मोफा) 1963 नुसार सुनावणी अंतर्गत निर्णय घेवून गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट मधील सभासद व सदनिका धारकांना अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

आनंदवार्ताः नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग सव्वातीन टक्क्यांनी वाढला; मालेगाववर विशेष लक्ष

नाशिक जिल्ह्यातील 12 ते 14 वर्षे वयोगटांमध्ये 60 टक्के लसीकरण पूर्ण झालेय. राज्यामध्ये नाशिक जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये जिल्ह्यातील 2 लाख 21 हजार 842 एवढे विद्यार्थी असून त्यापैकी 1 लाख 33 हजार 284 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये कोरोना (Corona) लसीकरणाचा (vaccination) वेग गेल्या दोन आठवड्यांत 3.24 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. शासनाने कोरोना महामारीचे सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनापासून आपण स्वत: व इतरांनाही सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कंबर कसलीय. आरोग्य यंत्रणेबरोबरच प्रशासकीय पातळीवरही वेळोवेळी बैठका घेवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करून काम करण्यात येत आहे. यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या डोसमध्ये 1 लाख 86 हजार 668 तर दुसऱ्या डोसमध्ये 4 लाख 14 हजार 095 इतकी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

मालेगावमध्ये अधिक प्रचार

मालेगाव महापालिकेमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथे अधिकाधिक प्रचार व प्रसार आणि लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आठवड्याच्या दर मंगळवारी दुपारी चार वाजता सर्व तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेऊन आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अशा सर्व यंत्रणांचा समन्वय साधून सामूहिकरीत्या हे काम पूर्ण करण्याचे धनुष्य जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.

credit and sources: tv9marathi.com