Our nashik.com Today's news
तिथी : द्वितीया
नक्षत्र: रोहिणी
वार : रविवार
शके : १९४२
विक्रम सवत्सर २०७८
नाशिक:: नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या लग्न समारंभात जात पंचायतीच्या सांगण्यावरून वधूची कौमार्य चाचणी केली जाणार असल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला असून यासंदर्भात पोलिसांत लेखी तक्रार देण्यात आली आहे.
......
नाशिक; नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक तथा' पानिपत ' कार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून समेलनास प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर उपस्थित राहणार असल्याचे समेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले.
...
नाशिक - शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन कृषी कायदे मोदी सरकारने रद्दबातल ठरविले ,सुमारे ७०० लोकांचा बळी भाजप सरकारने घेतला आणि जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे या बलिदानाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला ,अशी टिका केंद्रातील भाजप सरकारवर खा.संजय राऊत यांनी केली, नाशिकला विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास राऊत आले असता त्यांनी माध्यमांशी ( ता .२०) संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
.....
नाशिक : गावातील पथदिव्यांच्या देयकाची थकबाकी वाढल्याने महावितरणने गावातील वीजपुरवठा खंडित केला होता यासाठी सरपंच सेवा महासंघाने विविध स्तरावर आंदोलने केली होती. दरम्यान या आंदोलनास यश आले असून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरच्या पथ दिव्यांची देयके भागविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान राज्य विदुयत मंडळास न भरता ते जिल्हा परिषदेच्या मार्फत अदा करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे
नाशिक ; पोर्तुगाल येथे २ते आठ डिसेंबर दरम्यान ब आय टी टी एफ वल्ड चॅम्पियन शिप ही स्पर्धा होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या टेबल टेनिस स्पर्धेकरता भारतीय संघात नाशिकच्या सायली वाणीची निवड झाली आहे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी तिचा सन्मान केला आहे.
........
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक प्रा.मनीषा वाघमारे या भारतीय महिलेने नेपाळमधील २२,३४९ फूट उंचीच्या आमा दबलम पर्वतावर भारताचा तिरंगा फडकवला. तिने १५ नोव्हेंबर रोजी ही मोहीम फत्ते केली. हा पर्वत सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
........
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. दरवर्षी येथे हिंदु ,ख्रिश्चन समुदायातील सुमारे १०००महिलांना इस्लाम मध्ये धर्मातर केले जात असल्याचे समोर आले आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आशिकनाझ खोकर यांनी ही माहिती समोर आणली आहे. याबाबत त्यांनी 'ग्रीक सिटी टाइम्स या वृत्तपत्राचा हवाला दिला आहे.
......
युरोपात कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने लस सक्तीची करण्यात आली आहे. या निर्णयाला नागरिकांतून विरोध होत असल्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, आदी देशात निर्दशने सुरू आहेत तर नेदरलँड सारख्या देशात दंगल व जाळपोळ असे प्रकार घडत असून पोलीस अधिकारी यांच्यावर हल्ला होत असल्याचे बोलले जात आहे.