Our Nashik News

Our Nashik News

Our nashik.com

 Today's News

वार : मंगळवार दि; २३.११.२०२१

मिति मार्गशीर्ष ०२ शके १९४३

विक्रम सवत्सर : २०७८

तिथी; चतुर्थी

नक्षत्र : आर्द्रा

मास : कार्तिक 

दिनविशेष : अंगारकी चतुर्थी 

.................. ..........

राष्ट्रीय : हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांना शौर्य पुरस्कार

 नवी दिल्ली : हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविड यांच्या हस्ते सोमवारी ( ता.22) वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या अनेक नायकांचा सन्मान करण्यात आला.

..........

परमबीर भारतातच असल्याचे वकिलांचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग भारतातच असून ते ४८ तासांत हजर होणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाने परमबीर यांच्या अटकेवर स्थगिती आणत चॉकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले.

राज्य : 

एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश : 

राज्यातील एस.टी. कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून संप मिटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने अखेरीस उच्च न्यायालयाने संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत नियुक्त केलेल्या त्रिसदस्य समितीला २० डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी ( ता.२२) न्यायालयाने दिले.

......

प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

विधान परिषद पोट निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ.प्रज्ञा राजीव सातव यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता.

.....

नाशिक शहर

 दहशत माजविणाऱ्या १७ गुंडावर मोक्का : 

मागील अनेक दिवसांपासून नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प आदी परिसरात फिरून ,दुकानात शिरून तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवत बळजबरीने खंडणी वसूल करत दरोडे घालणाऱ्या १७ गुंडांना पोलीस आयुक्त दीपक पांडेय महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत ( मोक्का) कायद्याखाली अटक केली आहे.

......

विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हांचे प्रकाशन

शहरात होऊ घातलेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संम्मेलनाच्या बोधचिन्हाचे सोमवारी ( ता.२२) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, गणेश उन्हवणे, मनीष बसते राजू देसले आदी उपस्थित होते.

......

 दिवाळीनंतर शाळा पुन्हा ऑफलाईन सुरू

दिवाळीच्या सुटीनंतर प्राथमिक विभागाच्या शाळांमध्ये १५ नोव्हेंबर पासून ऑन लाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन सुरू झाले आहे. प्राथमिक नंतर आता माध्यमिक विभागाच्या शाळा सोमवार ( ता २२) पासून पुन्हा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत.

......

कोरोना काळात मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना गोदा गौरव पुरस्कार 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे अनुयायी ज्येष्ठ समाजसेवक कै. निवृत्तीराव दादाजी बर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री राजे छत्रपती, सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गोदागौरव पुरस्काराचे वितरण खा.छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते नाशिक येथील कालिदास नाट्यमंदिरात ( ता२२) करण्यात आले. यावेळी पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे, शिवसेनेचे ऊपनेते रविंद्र मिरलेकर , सुधाकर बडगुजर ,दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते