पंचवटी (नाशिक) : होळीनंतर पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीला गंगाघाटासह शनीचौकातील प्राचीन रहाडीत धप्पे मारत रंगात रंगण्याची परंपरा यंदा कोरोना संसर्गामुळे पुन्हा खंडित होणार आहे. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी व रहाडींमध्ये रंग खेळण्यास पोलिस प्रशासनाने मनाई केली आहे. एवढेच नव्हे, तर परिसरात संचारबंदीही लागू केली आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम (Marathi Medium School) शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad ) यांनी विधानसभेत दिली आहे. या बदलानुसार पहिलीपासूनच मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा (English Word) वापर करण्यात येणार असून, मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापरामुळे विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. त्यासोबतच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी विधीमंडळात केली आहे.
माझं घराणं हे माझ्यापासून सुरु होतं, हे आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वसंतरावांची सांगितिक कारकीर्द यशोशिखरावर पोहोचली असली तरी त्यांचा तिथंवर पोहोचण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. या संघर्षमयी (Marathi Entertainment) प्रवासात त्यांना कायम साथ लाभली ती महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची म्हणजेच पु. ल. देशपांडे (P L Deshpande) यांची. 'मी वसंतराव'च्या निमित्ताने त्यांच्या त्या काळात रंगलेल्या मैत्रीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. पंडित वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे या दोघांनाही साहित्याची आवड. तिथेच या दोघांचे सूर जुळले. पंडित वसंतराव देशपांडे यांच्यातील सच्चा गायक पु. ल. देशपांडे यांनी हेरला. आवाजातील जादू ओळखून कारकुनी सोडून पूर्णवेळ गायकी सुरु करण्याचा मोलाचा सल्ला भाईनी त्यावेळी वसंतरावांना दिला.
विद्यापीठ अनुदान आयोगानी ((University Grants commission) महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता कॉमन एंट्रेंस टेस्ट (Common University Entrance Test ) देण्यासाठी भाषा मर्यादा राहणार नसून मराठी, गुजराती, हिंदी सह 13 प्रादेशिक भाषांमध्ये Entrance Test देता येणार असल्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व UGC अनुदानित केंद्रीय विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे. (CUET for admission in UG programs will be conducted in 13 languages)
नाशिक : येथील साहित्य क्षेत्रातील एक मोठा शायर, एक नव्या विचाराचे अतिशय प्रतिभाशाली कवी गुलाम अहमद जोया (वय ९४) सोमवारी (ता.२१) निधन झाले. समाजातील क्षुद्र, संकुचित, मागास विचारांच्या प्रवृत्तीबरोबर आयुष्यभर त्यांचा लढा सुरू होता. नाशिकच्या श्रीमंत अशा कोकणी घरात जन्मलेले जोयाजींनी पुढे अतिशय साधेपणाने राहून समाज धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपली लेखणी हाती घेतली.
Source and Credit: Sakal