news at ournashik

news at ournashik

चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर

24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवम्यात आली आहे.

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात (Gold & Silver Rates Today) आज पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज 600 रुपयांची भाववाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा जवळपास 48 हजार झाला आहे. 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर 52 हजार तीनशे रुपयांच्या पार गेला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 640 रुपयांची भाववाढ नोंदवम्यात आली आहे. एकीकडे 54 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर हे आता 52 हजारांपर्यंत खाली उतरले असले तरिही आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरांचा आलेख हा पुन्हा चढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. गुडरीटर्न्सनं दिलेल्या माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोनं महागलंय. 22 आणि 24 या दोन्ही कॅरेट सोन्याच्या प्रकरात भाववाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सोनं जवळपास हजार रुपयांनी महागलं आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही (Gold Silver price increased) तेजी पाहायला मिळाली आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचा दर

  1. मुंबई 22 कॅरेट – 47 हजार 950 24 कॅरेट – 52 हजार 310
  2. नाशिक 22 कॅरेट – 48 हजार 50 24 कॅरेट – 52 हजार 350
  3. एकीकडे सोन्याचे दर वाढत असतानाच आता चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जवळपास हजार रुपयांची वाढ रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचे दर 68 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. 900 रुपयांची वाढ चांदीच्या दरात नोंदवण्यात आली आहे.
  4. नुकसानीनंतरही फळांच्या ‘राजा’चा तोरा कायम, स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल..!

    हंगामाच्या सुरवातीपासून एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर फळांचा राजा असलेला हापूस आंबा आता स्थानिक बाजारपेठेमध्येही दाखल झाला आहे. यापूर्वी केवळ मुख्य बाजारपेठेत हापूसचे आगमन झाले होते. पण आता हंगाम मध्यावर असताना रत्नागिरीसह लगतच असलेल्या पावस, गणेशगुळे आणि गणपतीपुळे येथीव स्थानिक बाजारपेठतही आवक झाली आहे. नुकासनीचा सामना करुनही या हापूसचा दरातील तोरा हा कायम आहे.

    दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट

    यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा बागांवर अवकाळी आणि ढगाळ वातावरणाची अवकृपा राहिलेली आहे. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर परिणाम झाला तर आता तोडणीच्या दरम्यान ऊन्हामध्ये वाढ झाल्याने थेट आंबा गळतीचा धोका निर्माण झाला होता. दरवर्षी पेक्षा यंदा केवळ 25 टक्केच आंब्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची मुख्य बाजारपेठेत आवक झाली आहे. शिवाय आता उन्हाचा चटका वाढत असल्याने मागणीही वाढत आहे. मात्र, मुळात उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा दर चढेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.