Todays Nashik News in marathi

Todays Nashik News in marathi

नाशिकची हवा झाली दूषित;वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले

नाशिक : लॉकडाऊनमध्ये स्वच्छ झालेली नाशिक शहरातील हवा अनलॉकनंतर आता पुन्हा प्रदुषित होऊ लागली आहे. हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, लहान मुलांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेसाठी नव्हे, तर दम्यापासून दूर राहण्यासाठी फिरण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असला तरी मुंबई, पुण्याइतके शहरीकरण झालेले नाही. आजही नाशिकपासून चारही बाजूने १० ते १५ किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर निसर्गरम्य वातावरणाची प्रचिती येते. मोकळी हवा, निसर्गरम्य वातावरण यामुळे वीकेंड डेस्टिनेशन म्हणून नाशिककडे बघितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत शहराच्या एअर इंडेक्सची गुणवत्ता घसरली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते एअर इंडेक्स १०० पेक्षा कमी असावा, परंतू नाशिकचा एअर इंडेक्स १०६ पर्यंत गेल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे. यामुळे हवेत मर्यादेपेक्षा अधिक असलेले धुलिकण श्वासाला त्रासदायक ठरकात. तसेच, दमा अस्थमाला कारणीभूत असतात. कार्बन उत्सर्जन आणि धूलिकण असे वेगवेगळे प्रकार प्रदूषणाला कारणीभूत आहेत.

प्रदूषणामुळे हवेत धोकादायक अतिसूक्ष्म कण हवेत मिसळतात. या कणांना पार्टिक्युलेट मॅटर (पीएम 2.5) म्हणतात. या कणांचा व्यास 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी असतो. हवेतील या लहान कणांमुळे वायूप्रदूषण झाल्यास दिवसादेखील दृश्यमानता कमी होते.

अशी होते हवा प्रदूषित हवेत 2.5 हे अतिसूक्ष्म आणि पीएम 10 हे सूक्ष्म धूलीकण हवेत तरंगत असतात. रस्त्यावरील धूळ, बांधकाम यातून हे धूलीकण पसरतात. हे कण श्वसनातून थेट फुफ्फुसात जातात. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात या समस्यांची तीव्रता वाढते.

air pollution

पर्यटन क्षेत्र म्हणून तपोवन विकसित करावे

पंचवटी : कुंभमेळा हा असा धार्मिक सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. नाशिक शहरात भरणार्‍या कुंभमेळ्यात सर्व साधू-महंतांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणजे साधुग्राम याच तपोवन भागात असते. सत्ताधारी पक्षातील माजी स्थायी समिती सभापती तसेच विद्यमान प्रभाग सभापती यांचा कृष्ण नगरपासून ते नांदूर-मानूर गावापर्यंत हा नवीन प्रभाग क्रमांक ४ आहे. कुंभमेळ्यात शहरातील विकाससाठी कोट्यवधी रुपये येत असतानाही प्रभागात अपेक्षित विकास किंवा नियोजन मात्र झालेले नाही.

या आहेत समस्या

  • लॉन्स आणि मंगल कार्यालये मोठ्या संख्येने असल्याने वाहतूक कोंडीची समस्या.
  • कॉलनी रस्त्याची दूरवस्था झालेली असून अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद.
  • प्रभागात मनोरंजनासाठी किंवा लहान मुलांच्या खेळण्यासाठी कुठेही उद्यान नाही.
  • परिसरातील उद्यानांमध्ये खेळण्यांची दूरवस्था झालेली आहे.
  • मिर्ची हॉटेल चौफुली येथे अपघात वाढले आहेत.

काय हवे प्रभागात

  • प्रभागातील युवक-युवतींना स्पर्धे परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका व डिजिटल लायब्ररी.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ असावा. प्रभागातील महिलांसाठी गृहउद्योग आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे.
  • मिर्ची हॉटेल चौफुली येथे हम्प किंवा गतिरोधक बसवावेत.
  • प्रभागात स्लम परिसर अधिक असल्याने महापालिकेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात यावी.
  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रभागाचा व्यापक विकास व्हावा.

हे आहेत इच्छूक

उद्धव निमसे, सुरेश खेताडे, मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, विशाल जेजुरकर, विद्या जेजूरकर, सोमनाथ बोडके, राहुल दराडे, वैभव ठाकरे, अमोल सूर्यवंशी, अश्विनी लभडे, शैलेश सूर्यवंशी, सुनीता निमसे, किरण पानकर, समाधान जेजूरकर, कमलाकर गोडसे, संकेत निमसे, भाऊसाहेब निमसे, अनंता सूर्यवंशी, संतोष जगताप, अमोल जगळे, उज्ज्वला बेलसरे, रामभाऊ संधान, सुवर्णा संधान, नीलेश पारीख.

 

Source and credit: My Mahanagar