Nashik news latest

Nashik news latest

अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लसीकरण दिरंगाईने, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी; कोरोनाचे निर्बंध जैसे थे

नाशिक – नाशिक (NASHIK) जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे (CORONA) निर्बंध जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. मालेगावमध्ये लसीकरण कार्यक्रमाला अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. जिल्हाधिकारी गंगाथरन डी (GANGATHARAN D) यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर सध्या मालेगावमध्ये मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात फक्त 16 लोकांनी लस घेतल्याने आच्छर्य व्यक्त केले जात आहे. ही प्रक्रिया जर अशीच सुरू राहिली तर शंभर टक्के लसीकरण कधी व्हायचं असा अनेकांना प्रश्न पडलाय. तसेच ज्या कारखान्यात किंवा जिथे लसीकरण झालेलं नाही अशी ठिकाण जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली आहेत.

अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना अपयश ?

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केल्यानंतर मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी सकाळपासून लसीकरण मोहिमेला रिंगणात उतरले. मात्र दिवसभरात चार मोठ्या अधिकाऱ्यांनी अवघ्या 16 जणांचे लसीकरण करुन आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी दिवसभरात मालेगावात अवघ्या 16 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अशा गतीने जर लसीकरणाची व्यापक मोहीम सुरु राहिली तर पूर्ण 100 टक्केचा आकडा गाठण्यासाठी मालेगावकरांना किती वर्षांची वाट बघावी, लागले, असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध जैसे थे

मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करायचे असतील तर कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे, असे निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी शहरात व्यापक मोहिम सुरु केली आहे. यंत्रमाग कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्याचे निर्दशनात येताच कारखाना सील करण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण झाल्याने कारखाना पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात निर्बंध कमी करण्यात आले आहेत. ज्या भागात कोरोनाचे अधिक रूग्ण आहेत तिथ काही प्रमाणात कोरोनाची नियमावली लावण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात लसीकरण सुध्दा चांगलं झालं आहे.

 

रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण, नाशिकमधील घटना 

नाशिक : जिल्ह्यातील लिलावती रुग्णालयात (Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात घडली आहे. मारहाण झालेला डॉक्टर (Doctor) अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, उपचारासाठी आरोपीनं त्याच्या मित्राला रुग्णालयात आणलं होतं. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण आरोपीनं केलीय. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी देखील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, नाशिकमधील डॉक्टरांच्या मुलाला झालेल्या मारहाणीचा प्रकार धक्कादायक आहे.  

मारहाण करणारा फरार

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत मारहाण झालेला डॉक्टर अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. उपचारासाठी आरोपीनं त्याच्या मित्राला रुग्णालयात आणलं होतं. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण आरोपीनं केलीय. मात्र, आरोपी फरार झालाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डॉक्टरांवरील मारहाणीचे  प्रकार

नाशिकमधील ही मारहाणीची आताची घटना असली तरी यापूर्वी रुग्णालयात जाऊन मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिकमधील या मारहाणीमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दिवसाढवळ्या रुग्णालयात घुसून मारहाण करणे, यासारख्या घटनेमुळे पोलिसांचा वचक कमी राहिल्याचं दिसतंय. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहतोय.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

रुग्णालयात घुसून अशा प्रकारे मारहाण केल्यानं शहरात परिसरात भीतीचं वातावरण आहे. मारहाण झालेला डॉक्टर अरुण विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  आता मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांना सीसीटीव्हीमधील फुटेजचीही मदत होतेय. मात्र, नाशिकमधील रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेमुळे दहशतीच वातावरण निर्माण झालंय. आता यावर पोलीस काय निर्णय घेतात. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय आवश्यक ते पाऊल उचलतात. याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. आशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हावेत.

 

सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) न्यायालय (Court) आता कात टाकणार आहे. या न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी तब्बल 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. सटाणा न्यायालयाची इमारत अतिशय जुनी झाल्याने आणि कामकाज करण्यात जागा कमी पडत असल्याने सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पंडित भदाणे, अॅड. रवींद्र पगार व नाशिक बार असोसिएशनचे सचिव अॅड. जालिंदर ताडगे यांनी सटाणा न्यायालय विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली होती.

अन् अखेर प्रश्न मार्गी

मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सटाणा न्यायालय इमारतीच्या बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सटाणा येथे नवीन विस्तारित न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मा. उच्च न्यायालय यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला आणि त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

कशी असेल नवीन इमारत?

सटाणा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, यासाठी दहा कोटी सदोतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून या नूतन इमारतीत दोन मजली वाहनतळ, गॅस पाइप, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रुफ टॉप, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा,आवरभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, मैदानाचा विकास, वाहनतळ, अंडरग्राउंड पाण्याची टाकी, पंप हाऊस, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. दरम्यान, लवकरच या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याचे जिल्ह्यातील वकिलांनी स्वागत केले आहे.

 

 

Source and credit: TV9