९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये ?
नाशिक दि .23 ( अमर ठोंबरे) मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आताशा कुठे मुहूर्त लागला असून हे संमेलन डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.संमेलनाध्यक्ष तथा प्रथितयश खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या परवानगीने नोव्हेंबरच्या काही तारखामध्ये बदल करत आयोजकांनी अखेर डिसेंबर महिन्यात संमेलन घेण्यावर एकमत केले आहे.
संमेलन स्थळाबाबत अनिश्चितता : यापुर्वी गोखले एज्युकेशन संस्थेच्या आर.वाय. के. एच.पी. टी महाविद्यालय परिसरात संमेलन निश्चित करण्यात आले होते मात्र आता पुन्हा स्वागताध्यक्ष असलेल्या ना.छगन भुजबळ यांच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात समेलनस्थल निश्चित होत असल्याचे समजते दरम्यान ही जागा नाशिक शहरापासून दूर असल्याने वाचकांची व एकूणच साहित्य प्रेमींची याला कितपत पसंती मिळते हे आगामी काही दिवसांत समजेलच.