Marathi News (बातम्या)

Marathi News (बातम्या)

 

Gold Rate | लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.

मुंबई : Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX)आज सोन्याची किंमत दुपारी 2 वाजे दरम्यान, 53003 रुपये प्रति तोळे इतके होता. तर चांदीचे दर 69250 रुपये प्रति किलो इतके होते. 
 
मुंबईतील सोने-चांदी व्यवसायिकांमध्ये पुन्हा वर्दळ वाढली आहे. काही ग्राहक गुंतवणूकीसाठी तर काही सणासुदीला सोनं खरेदीसाठी सराफा बाजारात येत आहेत. सध्या लग्नाकार्याचेही मुहूर्त सुरू झाले आहेत. त्यामुळे सराफा बाजारातही गर्दी दिसून येत आहे.
 
आड मुंबईत आजच्या सोन्याचे दर 54500 रुपये प्रति तोळे इतके आहेत. तर चांदीचे दर 68800 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरांमध्ये 350 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1,000 रुपये प्रति किलोची वाढ नोंदवली गेली आहे.
source and cradit:zeenewsindia

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) हाराकिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 12 रनने पराभव झाला आहे. पंजाबने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 20 ओव्हरमध्ये 186/9 पर्यंत मजल मारली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) लवकर आऊट झाल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी पंजाबच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांचा मुंबई इंडियन्सना मोठा फटका बसला.

मुंबई इंडियन्सने केलेल्या तीन चुकांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामिल होता. सूर्यकुमार आणि तिलक हे बॅटिंग करत असताना दोघांमध्ये गोंधळ झाला आणि यात तिलक वर्मा आऊट झाला. यानंतर सूर्या आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्यातही असाच गोंधळ झाला आणि पोलार्डला त्याची विकेट गमवावी लागली.