ऑपरेशन गंगा या मोहीमेअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या १९८ भारतीयांना घेऊन चौथं विमान काल संध्याकाळी दिल्लीला पोचलं. रूमानियाची राजधानी बुखारेस्टवरून आज निघालं होतं. त्याआधी २४० भारतीय नागरिकांना घेऊन आलेलं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहचलं.
या विमानानं बुडापेस्ट इथून उड्डाण केलं होतं. युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांची एक तुकडी युक्रेन हंगरी सीमेवरून बुडापेस्ट इथं पोहोचली होती. युद्धाच्या परिस्थितीमुळे युक्रेनच्या हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पाठवलेली विमानांचं उड्डाण रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथून केलं जात आहे.
युक्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी एकूण ४६९ जणांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून घेऊन निघालेली दोन विमानं काल अनुक्रमे मुंबई तसंच दिल्लीत दाखल झाली.
Source and credit: AIR news