Headlines at ournashik

Headlines at  ournashik

 

Daily News Update

ournashik news

21 st May 2022

Saturday

आस्मानी संकट! आसाममध्ये 7 लाख बाधित तर, बिहारमध्ये 33 जणांचा मृत्यू

पटना : बिहारमध्ये (Bihar) शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून (Lighting) 16 जिल्ह्यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. बिहारमधील या आस्मानी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Modi) खेद व्यक्त करत मदतीचे आश्वासन दिले आहे. (Asam Bihar Rain News)

तर, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि भूस्खलनामुळे आसामच्या अनेक (Asam) भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताज्या घटनांनुसार नागाव, होजई, कचार आणि दररंग या चार जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. येथे पूर आणि भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली असून, या भयानक पूर (Flood) स्थितीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमधील सुमारे 7.12 लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर, दुसरीकडे कर्नाटकातही या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर आला आहे.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं दुस-या टप्प्यांमध्ये पटकावलं सुवर्णपदक

दक्षिण कोरियातील ग्वांगजू इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं आज दुस-या टप्प्यांमध्ये  सुवर्णपदक पटकावलं आहे. या स्पर्धेत सुरूवातीला भारतीय संघ पहिल्या दोन सेटमध्ये पिछाडीवर होता.

मात्र त्यानंतर त्यांनी फ्रान्सवर दोन गुणांनी मात केली. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहान यांचा समावेश असलेल्या चौथ्या मानांकित भारतीय पुरुष संघानं फ्रान्सवर २३२-२३० अशी मात करत विजय मिळवला.

राज्यातली ११ वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार

राज्यातली ११ वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया 11thadmission.org.in/ या वेबसाइटवर सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना सरावासाठी अर्ज उपलब्ध भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. सोमवारपासून २७ मे पर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज या वेबसाइटवर भरता येतील. त्यानंतर २८ तारखेला ही सर्व माहिती काढून टाकली जाईल आणि ३० मे पासून अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल.

राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत, अर्जाचा पहिला भाग भरता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून पसंतीक्रम नोंदवता येईल, असंही त्या म्हणाल्या.

या केंद्रीय प्रक्रियेद्वारे सर्वसामान्य महाविद्यालयातल्या ८५ टक्के तर अल्पसंख्यांक महाविद्यालयातल्या ३५ टक्के जागांवर प्रवेश दिले जातील. दोन्ही महाविद्यालयांमधल्या १० टक्के जागा संस्थांतर्गत विद्यार्थ्यांसाठी तर ५ टक्के जागात व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव असतील. अल्पसंख्याक महाविद्यालयातल्या ५० टक्के जागांवर अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश दिले जातील, असंही राज्य सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातल्या उर्वरित ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

 तरुणाच्या हत्त्येप्रकरणी चौघे संशयित ताब्यात

म्हसरूळ (जि. नाशिक) : तीन दिवसांपूर्वी दिंडोरी रोड परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्त्येप्रकरणी (Murder Case) म्हसरूळ पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून चार संशयितांना नाशिकरोड रेल्वे स्थानक, नांदूर शिंगोटे, पवननगर, त्र्यंबक रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. 

आकाश पेट्रोल पंपाजवळील वीर सावरकर उद्यानात बुधवारी (ता.१८) रात्री ९ च्या सुमारास टोळक्याने केलेल्या हल्ल्यात यश गांगुर्डे या २४ वर्षीय युवकाची हत्त्या झाली. मित्रांमध्ये सुरू असलेले वाद मिटविण्यासाठी यश गेला होता. यावेळी दुसऱ्या गटातील संशयितांनी यशवर चॉपरने पाठीवर आणि पोटावर वार करत हत्या केली. खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने म्हसरूळ पोलीसांनी तपास चक्रे फिरवत सूरज रणजित गांगुर्डे (२८ रा. विरा सोसायटी, वीर सावरकर गार्डन पाठीमगे, आकाश पेट्रोल पंप,दिंडोरी रोड), मयूर इंद्रराज शिवचरण (२५, रा.फ्लॅट ०७, साई मनोरथ सोसायटी, गणपती मंदिर समोर, मेहरधाम, पेठरोड), अथर्व किरण निसाळ (२१, रा.फ्लॅट न.०३, गायत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी), सौरभ दीपक देशमुख (१९, रा. पिकॉक हिल समोर, देशमुख वस्ती, दिंडोरी रोड) या फरार असलेल्या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.