Covid News

Covid News

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना मिळाल्या १७३ कोटी ७८ लाखापेक्षा जास्त प्रतिबंधक लशीच्या मात्रा

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना १७३ कोटी ७८ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. त्यात ७६ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. १५ ते १८ वयोगटातल्या युवकांना ७ कोटीपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ७० लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. आज सकाळपासून सुमारे ४० लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

 

राज्यात आज सकाळपासून २ लाख ७९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी २७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ४४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर, १३ लाख ६३ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४३ लाख ७९ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.