Corona news latest

Corona news latest

राज्यात आतापर्यंत ७७ लाख १० हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त

आकाशवाणी

राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर  ९८  पूर्णांक ३ शतांश टक्के झाला आहे. आज राज्यभरात ७८२ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ३६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ६५ हजार २९८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख १०  हजार ३७६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४३ हजार ६९७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७ हजार २२८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२९ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ४५६ रुग्ण बरे झाले आहेत.

 

कोरोनाचा शेवट जवळ; WHO कडून मोठा खुलासा, उरले फक्त...

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून जवळपास आपण कोरोनाच्या महामारीचा सामना करतोय. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की, कोरोनाचा अंत कधी होणार? ही महामारी कधी संपणार? दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. 2022 मध्ये कोरोनाच्या या महामारीचा अंत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

2022 मध्ये संपणार कोरोनाची महामारी?

सध्या ही भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. मात्र WHOला अशी आशा आहे की, जर अजून काही नाही झालं तर ही महामारी 2022मध्ये संपण्याची शक्यता आहे. महामारीचा अंत होणार म्हणजे कोणता मोठा प्रकोप होणार नाही.

व्हायरस म्यूटेशन करण्यासाठी सक्षम

WHOने म्हटलंय की, रूग्णांच्या संख्येत वाढ झाली म्हणजे याचा अर्थ व्हायरस म्यूटेशनसाठी सक्षम आहे. त्यामुळे आम्हाला नेमकं माहिती नाही की, कशी परिस्थिती निर्माण होणार आहे. 

वेगाने पसरला ओमायक्रॉन व्हेरिएंट

वुजनोविकच्या नुसार, डब्ल्यूएचओ भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करतंय की, ही महामारी कधी संपेल? मात्र आता हे सांगणं खूप कठीण आहे कारण, प्रत्येक देश त्यांची रणनिती बदलतोय. ओमायक्रॉन व्हेरिएंट खूप संसर्गजन्य होता आणि वेगाने पसरत होता. यावेळी काही देशांमध्ये लक्षणविरहीत रूग्णांची संख्या वाढत होती मात्र सर्वांची टेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसै नव्हते. 

काही देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होताना दिसतेय. रूग्णसंख्या कमी होताच या ठिकाणी निर्बंधंही शिथिल करण्यात आले आहेत. स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये सगळे कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आलेत.

 

महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे.

अलिबाग: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (corona) घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि (mask free) कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मास्क काढण्याबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मास्कवर भाष्य केलं.

कोरोनाची साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील. पण आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लवकरात लवकर इमारतीची उभारणी करा

अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. रुग्णालय इमारत लवकरात लवकर बांधून हे रुग्णालय सुरु होईल हे पाहिले जावे, असंही त्यांनी सांगितलं.

नुसत्या मागण्या करून काही होत नाही

गेल्या दोन वर्षात रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पीटलचे उदघाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करत आहोत. मागण्या अनेक असतात. नुसत्या मागण्या करून काही होत नाही, त्याच्या पुर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी याचा खूप पाठपुरावा केला, असं त्यांनी सांगितलं.