राष्ट्रीय मिती चैत्र २८, शक संवत १९४४, वैशाख कृष्ण द्वितीया, सोमवार, विक्रम संवत २०७९. सौर वैशाख मास प्रविष्टे ०५, रमजान १६, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १८ एप्रिल २०२२ ई. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतू.
संध्याकाळी ०७ वाजून ३० मिनिट ते ०९ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी संध्याकाळी ०७ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथीची सुरुवात. विशाखा नक्षत्र अर्धरात्रीनंतर ०३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्राची सुरुवात.
सिद्ध योग रात्री ०८ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योगाची सुरुवात. तैतील करण संध्याकाळी ०८ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करणाची सुरुवात. चंद्र रात्री १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत तूळ नंतर वृश्चिक राशीत संचार करेल.
सूर्योदय : सकाळी ५ वाजून ५२ मिनिट
सूर्यास्त : संध्याकाळी ०६ वाजून ४८ मिनिट
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५५ मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ४२ वाजेपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ०६ वाजून ३६ मिनिट ते ०७ वाजेपर्यंत. अमृत काळ संध्याकाळी ०७ वाजून ३३ मिनिट ते ०९ वाजून ०१ मिनिटांपर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग दुसऱ्या दिवशी सकाळी ०३ वाजून ३९ मिनिट ते ०५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.
Price | 1 gram | 8 gram | 10 gram | 100 gram |
---|---|---|---|---|
Today | ₹ 4988 | ₹ 39904 | ₹ 49880 | ₹ 498800 |
Yesterday | ₹ 4958 | ₹ 39664 | ₹ 49580 | ₹ 495800 |
Change | +30 | +240 | +300 | +3000 |
नाशिक, 18 एप्रिल: सकाळी सकाळी नाशकातून (Nashik city) एक अपघाताची (accident)बातमी समोर येतेय. नाशिक शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन कारची एकमेकांना टक्कर झालीय. या धडकेतून दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 1 वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय.
या भीषण अपघातात 5 वर्षांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही कारमधील एकूण 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
नाशिक,18 एप्रिल: सध्या राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय केलेल्या घोषणेनंतर एकच वाद सुरु झाला आहे. 3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर येते. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.
नाशिक, 13 एप्रिल : नाशिकमध्ये आज संध्याकाळी भर रस्त्यावर बर्निंग कारचा (Burning Car) थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला. गाडीला भीषण आग (fire) लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत गाडीतील प्रवासी आणि चालक सुदैवाने बचावले आहेत. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली. घटनेनंतर काही जणांनी तातडीने अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. पण या घटनेत गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
credit and sources:
fresherslive.com
lokmat.news18.com