नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक गावांची दुर्दशा झाली आहे. पेठ तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. तालुक्यातील घनशेत, कुळवंडी, आमलोन, शेवखंडी, अभेटी आदींसह बरडापाडा गावात अनेक घरांची दुर्दशा झाली आहे. याच पावसात बरडापाडा येथील तरुण शेतकऱ्यांने जीवतोड मेहनत घेऊन उभारलेली चार एकरवर उभारलेली पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाली आहे. जवळपास 13 हजारहून अधिक पक्षांचा वादळी वाऱ्यात मृत्यू झाला आहे