Published by: Ournashik.com
Date: 21-02-2022
मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीची ४ हजार पत्रं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाठवण्यात आली. मराठी भाषेला "अभिजात" दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आलं असून हा "अभिजात" दर्जा २७ फेब्रुवारी २०२२रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. पत्रांचा हा दुसरा संच असून याआधी सुमारे एक लाख २० हजार पत्रं पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.