नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यंदा कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावताना केलेल्या लोकसेवेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल पेठे, विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकला क्षेत्रातल्या योगदाना बद्दल डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबला वादक पं. सुरेश तळवळकर आणि अदम्य साहस दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या सीताबाई काळु घारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सीताबाई घारे यांनी बिबट्याशी झुंज दिली हेाती. प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २१ हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं  स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी नाशिक मध्ये या पुरस्कारांचं  वितरण होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं १९९२ सालापासून विविध क्षेत्रातल्या येागदानाबद्दल एक वर्षा आड हे पुरस्कार दिले जातात.