Friday 31 dec.2021, शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१
Today's nashik news
नाशिक शहरात ओमयक्रॉनचा पहिला रुग्ण, नागरिकांत खळबळ
नाशिक : नाशिक येथील गंगापूर रोड परिसरात दहा वर्ष्याच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून त्याची प्रकृती स्थिर आहे.गुरुवारी ( ता.30) रोजी संबंधित बालकाचा अहवाल ओमयक्रोन बाधित असल्याचे समोर आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सतर्क राहण्याचा सूचना
नवी दिल्ली ; महाराष्ट्रसह आठ राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून त्या ठिकाणीं लसीकरण ,चाचण्याचा वेग वाढवावा, कडक निर्बंध लादावेत ,असे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाठवले आहे.
आजपासून कडक निर्बंध
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि बाधित रुग्णाची संख्या पाच हजारांवर गेल्याचा पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
संत गजानन महाराज सायकल वारीचे रविवारी नाशिक येथून प्रस्थान
नाशिक ; मागील 21 वर्षे अखंडितपणे पर्यावरण संदेश देत नाशिक ते शेगाव सायकल वारीचे प्रस्थान रविवार ( ता.२) रोजी होणार असून वारीचे हे 22 वे वर्ष आहे.सायकल वारीचे आयोजक ह.भ.प.स्वामी प्रल्हाद महाराज भांड हे या वारीचे संस्थापक अद्यक्ष आहेत.यावर्षी एकूण 70 लोकांनी या वारीत आपला सहभाग नोंदवला आहे. नाशिक ते संत नगरी शेगाव पर्यंत विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, संत विचारांचा प्रसार प्रचार करणे, असा संदेश देत ही वारी दरवर्षी सुमारे 400 किमीचा प्रवास करते
ब्ल्यु व्हेल ने घेतला युवकाचा बळी
नाशिक रोड : ब्ल्यू व्हेल य या ऑन लाईन गेम खेळत असताना नाशिकरोड जवळील गायकवाड माळ येथील प्रमोद जाधव यांचा मुलगा तुषार जाधव याने मनगटावर धारदार सुरीने नसा कापून घेत व त्यानंतर घरात फाशी घेऊन आपले जीवन संपवले.दरम्यान तुषारच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पबजी नंतर हा नवा गेम पुन्हा एकदा तरुणांच्या जीवावर उठला असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
बालसाहित्यिक संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली; साहीत्य अकादमीचे सन 2021 चे पुरस्कार जाहीर झाले असून मराठी साहित्यासाठीच्या पुरस्कार विजेत्यामध्ये लेखक किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सुखदेव आणि बाल साहित्यिक संजय वाघ यांचा समावेश आहे. संजय वाघ हे लोकमत च्या नाशिक आवृत्तीचे उप वृत्तसंपादक असून त्यांनी लहान मुलांसाठी विपुल लेखन केले आहे त्यांच्या जोकर बनला किंगमेकर या पुस्तकाला यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारास बेड्या
नाशिक : चेहडी पपिंग येथील एका लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदाराला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पीडितेच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी खराटे नामक व्यक्तीस अटक केली आहे. अनिल माधवराव खराटे असे या दुकानदाराचे नाव आहे. मुलगी दुकानात आली असता तिच्या अंगाला विचित्र स्पर्श केल्याचे तिने आईवडिलांना सांगितले. त्यानुसार पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी