Today's news

Today's news

Today's news

वार : शुक्रवार , १० डिसेंम्बर २०२१, शके १९,४२ शुक्ल पक्ष,तिथी सप्तमी विक्रम संवसर २०७८

शेतकरी आंदोलन मागे ,कृषी कायदे मागे घेतल्याने जल्लोष 

नवी दिल्ली ; केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात   गेल्या ३७८ दिवसापासून राजधानी दिल्लीत ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनि अखेरीस गुरुवारी आपले आंदोलन मागे घेतले. संयुक्त किसान मोर्चाने ही माहिती दिली. दरम्यान शेतकरी नेते १3 डिसेंबर रोजी श्री हरमंदिर साहिब येथे जाऊन शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला

नवी दिल्ली : तामिळनाडू मध्ये भारतीय हवाई दलाचे एम आय १७ व्ही-५ हेलिकॉप्टर बुधवारी ( ता .८) कोसळून झालेल्या अपघातात देशाचे पहिले संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह सर्व मृतांना संसदेच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दरम्यान अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यातील माहिती विश्लेषनावरून दुर्घटनेचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल

शहरातील प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू होणार

नाशिक कोरोनाच्या महामारी नंतर तब्बल दीड वर्षेहुन अधिक कालावधीनंतर शहरांतील प्राथमिक शाळा सोमवार ( ता १३) पासून सुरू होणार आहे. बच्चे कंपनीला याचा आनंद होणार असून पालक मात्र थोडे चिंतेच्या सावटाखाली आहेत 

धावत्या रेल्वेतून आठ लाख लांबविले

मनमाड : धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास लोहमार्ग पोलिसांनी चारच तासांत अटक केली आहे. पोलिसांनी संशयीताकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कोरोना बळींच्या वारसांचे मदतीसाठी अर्ज 

नाशिक : कोरोनाच्या आकस्मिक संकटामुळे अनेकांचे बळी गेले आणि संसार उघड्यावर आले.मुलाबाळांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यावर शासनाने दिलासा देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू होताच तीन हजार कोरोना बळींच्या वारसांचे मदतीचे अर्ज महापालिकेला प्राप्त झाले.

नीलमोहर काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

नाशिक : कवयित्री जयश्री वाघ यांच्या निलमोहर या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मु. श.औरंगाबादकर सभागृहात  आज जेष्ठ साहित्यिक कमलाकर देसले ,जयप्रकाश जातेगावकर, डॉ शंकर बोऱ्हाडे, विवेक उगलमुगले आदींच्या उपस्थित होणार आहे.

एस टी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच

नाशिक : गेल्या महिनाभरापासून संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नाशिक विभागात ६० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर बदल्यांची कारवाई करण्यात आली आहे.

मनकर्णिका  पुरस्काराचे आज वितरण

नाशिक ; प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनिना सिडकोतील केएसकेडब्लू महाविद्यालयातर्फे मनकर्णिका पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमास मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार ,नगराध्यक्ष दुर्गा तांबे ,नाना महाले आदी उपस्थित राहणार आहेत.

चंपाषष्ठीनिमित्ताने मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा ; 

नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत काल ( ता ९) रोजी नाशिक शहर व जिल्ह्यात कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आला. भाविकांनी खंडोबाची परंपरेप्रमाणे तळी भरून भंडाऱ्याची  उधळण करण्यात आली. व प्रसादाचे वाटप करण्यात आले. ठीक ठिकाणच्या मार्तंड भैरव खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.