Today's news

Today's news

Todays news

गुरुवार  दि ०२/१२/ २०२१,मिति मार्गशीर्ष शके १९४२कृष्ण पक्ष विक्रम संवसर २०७८ नक्षत्र ,स्वाती , तपमान: कमाल २०.५ किमान १९.२

................

अवकाळी पावसाने राज्यासह शहर व जिल्ह्यास झोडपले

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बेमोसमी पाऊस सुरू झाला काल बुधवार ( ता.०१) शहरात व जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरूच राहिली दरम्यान या अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, मका आदि पिकांना मोठा फटका बसला आहे. संततधार पावसाने थंडीत वाढ झाली असून दिवसभर कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्र सरकारसमोर ओमीक्रॉनचे आव्हान

कोविड लसीकरण हळूहळू पूर्णत्वास जाते न जाते तोच ओमीक्रोनच्या वाढत्या प्रभावाने सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.नुकतेच काही दिवसापूर्वी अनलॉक झालेले राज्य पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार की नव्या व्हेरिएन्टचा सामना कोविड प्रमाणे जीवन जगत करावा लागणार असा प्रश्न सरकार समोर पडला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २००पदाची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध संवर्गातील २०० पदांची भरती करण्यात येणार आहे. येत्या ४तारखेपासून नाशिकसह औरंगाबाद, पुणे, नागपूर,आदी केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सहाय्यक राज्य कर आयुक्त,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त आदी विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.

पाच नगरपंचायतींची निवडुक प्रक्रिया सुरू

नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह कळवण, नगरपंचायतीसाठी कालपासून ( ता.१) नामनिर्देशपत्रे दाखल करण्यात येत आहे

कुसुमाग्रज नगरी गजबजली 

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ( दि १) संमेलन स्थळ अर्थात कुसुमाग्रजनगरी गजबजून गेली आहे नाशिक शहरापासून महापालिकेच्या वतीने संमेलन स्थळपर्यंत  बससेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केले मुलाचे अपहरण

आईनेच प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले आहे, अपहरण केल्याची फिर्याद मुलाच्या पित्याने दाखल केली आहे चेहडी पंपिंग रोड परिसरात प्रशांत रणदिवे हे पत्नीसोबत राहत होते.त्यांचा विवाह बारा वर्ष्यापूर्वी झाला होता  चारित्र्याचे संशयावरून  त्यांच्यात आपसात नेहमी धुसफूस  होत होती .दरम्यान प्रशांत घरी नसल्याचे पाहून त्याच्या पत्नीने मुलगा श्रवण यास प्रियकराच्या मदतीने पळवून नेले,व घरातील रोख रक्कमही लांबविली याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.