Today's news

Today's news

Today's news nashik 28 dec.21 ,Tuesday  नाशिक वार्तांकन मंगळवार 

मुलांच्या लसीकरणासाठी जानेवारीपासून नोंदणी

मुंबई : १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले कोरोना लस घेण्यासाठी दि १ जानेवारीपासून कोविन अँपवर नावनोंदणी करू शकतील असे या ऐपचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा यांनी सांगितले. या वयोगटातील मुलांना ३ जानेवारी पासून लस देण्यास सुरुवात होईल.

ओझर पाठोपाठ लखमापूरलाही टांगा शर्यतीवर गुन्हा 

नाशिक : मागील आठवड्यात ओझर येथे विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल माजी आमदारासह दहा जणांवर गुन्हा दाखल होण्याची घटना ताजी असतांना रविवारी ( ता,२७) दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर शिवारात घोडा बैल यांची शर्यत विनापरवानगी आयोजित केल्याबद्दल आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ गीतकार विनयदादा पाठारे यांचे निधन

नाशिक : येथील ज्येष्ठ गीतकार,गायक संगीतकार विनय दादा पाठारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ७४ वर्षाचे होते सोमवारी ( ता.२७) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.पाठारे हे निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील रहिवासी होते.दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत त्यांनी गायन तसेच अभिनय केला होता.शास्त्रीय संगीताचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेले नसताना संगीताचे उत्तम जाण असलेले विनय दादा कसलेले गायक होते.उत्तम गळा, पहाडी आवाज,स्पष्ट उच्चार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते.

एस टी च्या संपाने पर्यटक व भाविकांचे हाल 

नाशिक : शासनात विलीनीकरण करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून संपावर गेलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे ऐन सुट्याच्या काळात प्रवासी व भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाताळ आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे नाशिक येथे सप्तशृंगी गड, शिर्डी, अंजिठा लेणी,वेरूळ आदी ठिकाणी जाणाऱ्या भाविकांनी नाशिक सह मनमाड आदी ठिकाणी गर्दी केली होती मात्र एस टी चा संप मिटला नसल्याने मिळेल त्या वाहनाने लोक आपल्या इच्छित स्थळी जात होते.खासगी वाहन चालक याचा गैरफायदा घेत प्रवाशी बांधवांना लुटत असल्याचे दिसत होते.