वार : बुधवार, ता १ डिसेंबर २०२१ तिथी द्वादशी , शके १९४२, विक्रम संवसर, कृष्ण पक्ष ,नक्षत्र : चित्रा दिनविशेष : जागतिक एड्स निर्मूलन दिन
..............................
राष्ट्रीय : ओमीक्रॉनचा भारतात शिरकाव नसल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा
दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरत असलेल्या ओमीक्रॉन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप भारतात नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्य : मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्याच्या वारसांना प्रत्येकी १०लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबीयांसाठी मदतीची रक्कम संबंधितजिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यात आली आहे.
संपामुळे एस टी चे बुडाले ४३९ कोटी
एस टी कर्मचाऱ्याच्या ३५दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे एस टी महामंडळाचे तब्बल ४३९ कोटी रूपये बुडाले आहेत.तर नियमित प्रवाशी संख्येत घट झाली आहे.
नाशिक शहर;
डॉ.सुनंदा गोसावी यांचे निधन
नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या व नाशिक मधील महिला सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या डॉ.सुनंदा मोरेश्वर गोसावी यांचे मंगळवारी ( ता ३०), निधन झाले.बुधवारी ता १ रोजी त्यांच्यावर नाशिकच्या अमर धाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.संस्थेचे सचिव व डायरेक्ट जनरल मो.स.गोसावी यांच्या त्या पत्नी होत.
ओमीक्रॉनच्या भीतीने नाशिकमध्ये लसीकरण केंद्रावर गर्दी
वेगाने पसरणाऱ्या ओमीक्रोन व्हेरिएन्टची नाशिककरांनी धास्ती घेतली असून लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करत आहेत. आतापर्यंत शहरातील १८ लाख ४१ हजार २२७ नागरीकांनी लस घेतली आहे.दरम्यान ओमीक्रोन चा धोका लक्षात घेता नागरिकानी काल ( ता.३०) एकाच दिवशी उच्चअंकी २६ हजार ८८४ नागरिकांनी लसीकरण केले.
विना हेल्मेट दुचाकी चालकांची होणार परीक्षा, :
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पुन्हा एकदा कम्बर कसली असून आता विना हेल्मेट बाईक चालविनाऱ्याची परीक्षा घेतली जाणार आहे.,त्यात त्यांना वाहतुक विषयक प्रश्न विचारले जाणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत लीळा चरित्र ठेवण्याची मागणी
साहित्य समेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात होणार असून या ग्रंथ दिंडीत लीळा चरित्र ठेवण्याची मागणी हरिहर पांडये यांनी निवेदनाद्वारे केली आहे.