Russia Ukraine War

Russia Ukraine War

युक्रेन आणि रशिया यांच्यात बेलारुस सीमेवर चर्चा सुरु


युक्रेन आणि रशिया यांच्यात बेलारुस सीमेवर चर्चा सुरु झाली आहे. तात्काळ युद्धविराम हा या चर्च़ेमागचा आपला हेतू असल्याचं, युक्रेननं म्हटलं आहे. युक्रेनमधे रशियानं केलेल्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ रशियाच्या विमानांना आपले हवाई मार्ग करणाऱ्या देशांमधे आता बेल्जियम, फिनलंड आणि कॅनडा यांची भर पडली आहे.  अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चात्य देशांनी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे. 
 

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचलं

आकाशवाणी
 
युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विशेष विमान आज संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचलं. त्यात राज्यातल्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनानं सहायक कक्ष सुरू केला आहे. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी यूक्रेनच्या शेजारील ४ देशांमध्ये भारताचे विशेष दूत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. 
 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ताप अरिंदम बागची यांनी आज नवी दिल्लीलत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. हावी वाहतूक मंत्री ज्योरतिरादित्य् सिंधिया रोमानियाला, केंद्रीय कायदे मंत्री मंत्री किरेन रिजिजू स्लोरवाकियाला,केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप पुरी हंगेरीला रवाना होतील. नागरीहवाई वाहतूक  राज्यो मंत्री जनरल वी० के० सिंह पोलंडला जातील. हे विशेष दूत यूक्रेनमधून भारतीय नागरिकोंना सुरक्षितपरत आणण्यासाठीच्या कार्यात समन्वयय साधतील. आव्हान आहेत तरीही भारतानं गेल्या २४ तासात आपल्या नागरिकाना तिथून बाहेर काढण्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत सुमारे ८ हजारापेक्षा जास्त भारतीयांनी युक्रेन सोडलं आहे. ६ विमानातून सुमारे १ हजार ४०० भारतीयांना स्वदेशी आणलं असल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. 

हंगेरी सीमारेषेजवळून निर्वासन प्रक्रियेत वाढ करण्यात येणार असल्याचं बागची यानी सांगितलं. मोल्दोवा इथून नवीन मार्ग खुला झाला असल्याचंही ते म्हंणाले. मोल्दोवा इथे एक दल  पोहोचल असून रोमेनिया इथून निर्वासन प्रक्रिया सुरु होण्यासाठी ते मदत करणार आहेत .दक्षिण युक्रेन मधल्या भारतीयांना या मार्गाचा उपयोग होईल असं बागची म्हणाले. पुढच्या २४ तासात ३ अतिरिक्त विमान उड्डाण उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापैकी २ बुखारेस्टहून आणि १ बुडापेस्टहून सुटेल.   

         
ऑपेरेशन गंगा अंतर्गत कोणाकडूनही कोणतंही शुल्क आकारल  जाणार नाही असं बागची यांनी स्पष्ट केलं.  दरम्यान भारत युक्रेनला औषधांसह इतर मदतही  करणार असल्याचं  ते म्हणाले.
 

 

रशियाला चीनचा पाठिंबा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट

 

युक्रेन आणि रशियातील संर्घष शिगेला पोहोचला आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. त्यामुळे पिरिस्थिती गंभीर बनलीये.

 

 

पुतीन यांची सर्वात मोठी खेळी; थेट युक्रेनच्या सैन्याला दिली ऑफर, म्हणाले...

मॉस्को: युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश देणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin ) यांनी आता सर्वात मोठी चाल खेळली आहे. पुतीन यांनी थेट युक्रेनच्या सैन्यालाच साद घातली असून युक्रेनमधलं झेलेन्स्की यांचं सरकार उलथवण्याचं आवाहन केलं आहे. पुतीन यांच्या या खेळीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. ( Russia Ukraine War Latest Breaking News )

रशिया आणि युक्रेन यांच्यात गुरुवारपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरं या युद्धात होरपळली असून राजधानी कीव्हपर्यंत रशियाच्या फौजा पोहचल्या आहेत. या युद्धाला विराम मिळावा म्हणून जागतिक पातळीवरून विविध मार्गांनी रशियावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात असतानाच रशियाचे अध्यक्ष पुतीन हे मात्र सर्वांना चक्रावून टाकणाऱ्या चाली खेळत आहेत. पुतीन यांनी रशियन सरकारच्या 'आरटी' या अधिकृत टीव्ही माध्यमातून थेट युक्रेनच्या सैन्याला संबोधित केले असून युक्रेनची सत्ता हातात घेण्याचे आवाहनच त्यांना केले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना पुतीन यांनी टार्गेट केले आहे. युक्रेनच्या नेतृत्वाची 'दहशतवादी', 'नवनाझी', 'ड्रग अ‍ॅडिक्ट्स', अशी संभावना करत सध्याचे सरकार उलथवण्याची विनंतीच पुतीन यांनी युक्रेनी सैन्याला केली. 'ड्रग अ‍ॅडिक्ट्स आणि नवनाझींच्या टोळीच्या तुलनेत तुमच्याशी जुळवून घेणे आम्हाला अधिक सोपे जाईल, असे पुतीन यांनी नमूद केले. स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या युक्रेनच्या नेतृत्वाचे वागणे दहशतवाद्यासारखे आहे. रशियन सैन्याला हल्ला करण्यास प्रवृत्त केले गेले. अनेक शहरांत निवासी क्षेत्रांत शस्त्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली. राजधानी कीव्ह , खारकिव्ह तसेच इतर शहरांत भर वस्तीत रॉकेट लाँचर तैनात ठेवण्याची तयारीही या नवनाझींच्या टोळक्याने केली होती. यातून तुम्ही बोध घ्या आणि हे सरकार उलथवा. त्यातच युक्रेनचं हित आहे, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी राजधानी कीव्हमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचं संकट राजधानीपर्यंत पोहचलं असताना युक्रेनी सैन्याला झेलेन्स्की हे बळ देण्याचे काम करत आहेत. 'शत्रूचं पहिलं टार्गेट मी आहे आणि दुसरा निशाणा माझ्या कुटुंबावर आहे. पण मी डगमगणार नाही. मी राजधानीतच राहणार. माझं कुटुंबही युक्रेन सोडणार नाही', असे एका व्हिडिओ संदेशातून झेलेन्स्की यांनी ठणकावले आहे. मुख्य म्हणजे युक्रेनमध्ये रशियाचे एक हजार सैनिक मारले गेले असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.