इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार - उदय सामंत

इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार - उदय सामंत

राज्याची शासकीय रेखाकला अर्थात इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. या परीक्षेबाबत सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेता ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी असा निर्णय या बैठकीत झाल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी नोंदणी झालेला एकही विद्यार्थी, परीक्षेपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीनं परीक्षेचं नियोजन करावं, असे निर्देश संबंधितांना आदेश दिले असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.