नीटच्या पदवीपूर्व परीक्षेसाठीचीकमाल वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णय राष्ट्रीयवैद्यकीय आयोगानं घेतला आहे. आयोगाच्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीयअभ्यासक्रमासंदर्भात सगळे निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून घेतले जात असून या संदर्भातआयोगानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला पत्र पाठवलं आहे. याआधी खुल्या वर्गासाठी वय वर्षं २५ तर आरक्षित वर्गातल्या उमेदवारांसाठी ३० वर्षांची वयोमर्यादा निर्धारित होती.
Source and credit: AIR News