एस टी कामगारांच्या विलिनिकरणाबाबतची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज बातमिदारांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता. या अहवालावर आज सुनावणी होणार होती.
विलनिकरण सोडून उर्वरीत सर्व मागण्या मान्य केल्याचं परब यांनी सांगितलं. एस टी कर्मचाऱ्यांचे पगार कापल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांवर फिरत आहेत. या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं परब म्हणाले. सर्व कामगारांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.