सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईत काल कोरोनाच्या २५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४३९ रुग्ण बरे झाले. काल आढळून आलेल्यांपैकी ९१ टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत.

सध्या मुंबईतल्या रुग्णालयात ९३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४४८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे.