तोटा कमी होणार
पाथर्डी येथील गॅस प्रकल्पातून रविवारी महापालिकेला 1200 किलो इतके सीएनजी मिळणार आहे. त्यानुसार सोमवारी 15 बस सुरू होणार आहेत. एप्रिलपर्यंत 12000 किलो सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात 100 सीएनजी बस रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवसाकाठाचे उत्पन्न वाढूनही सेवा तोट्यात जात होती. आता सीएनजीवर सिटी बस धावल्या तर इंधन खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे बस व्यवस्थापनाचा तोटाही कमी होणार आहे.
चाकरमान्यांना मोठा आधार
दिवाळीपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे हे कामगार रोज सिटर रिक्षातून असुरक्षित प्रवास करण्याऐवजी थेट सिटीलिंक बससेवेचा पर्याय निवडत आहेत.
Source and Credit: TV9