महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला नेहमीच्या पद्धतीनं ऑफलाईन सुरुवात झाली. विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान, या शाखांचे १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्व परिक्षास्थळांवर कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सर्व पालक आणि शिक्षकांचे आभार मानले आहेत.
Source and credit: Ournashik.com