Nashik news

Nashik news

   नाशिक शहर ताज्या बातम्या 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा वाजला बिगुल : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून विद्यमान सभापती देविदास पिगळे यांच्या गटाने ' अपना पॅनल ' ची घोषणा केली आहे.

साताऱ्यात एस टी कर्मचाऱ्याचा मृत्यू  : साताऱ्यात मेढा एस टी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या संपामुळे व त्यातुन निर्माण झालेल्या मानसिक धक्क्याने हृदय विकाराच्या  झटक्याने निधन झाले संतोष वसंत शिंदें ( वय ३४)असे त्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे

२४ तासांत कामावर हजर होण्याचा एस टी कामगारांना आदेश : एस टी चे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून संपावर असणाऱ्या एस टी  कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४तासांत कामावर रुजू न झाल्यास  सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल अशा सूचना नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग फरार घोषित ; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध लेटर बॉम्ब टाकल्यानंतर राज्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे

नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांत आढळला रोमन खेळाचा पट ; दि,: १८ - नाशिकच्या ऐतिहासिक दस्तऐवजात भर घालणारा सुमारे २००० वर्षे पूर्वीचा रोमन संस्कृतीतला खेळाचा पट इथल्या लेण्यांत आढळून आला आहे नाशिकच्या एच पि टी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. रामदास भोंग यांनी हा सांस्कृतिक दस्तावेज समोर आणला आहे.

शेततळ्यात बुडून दोघा भावंडांचा मृत्यु: - दोन सख्या भावांचा घरच्याच शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात बुधवारी ( ता.१७) घडली .पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा ओम व साहिल अशी त्यांची नावे आहेत

हळदी समारंभात गर्दी जमवणे नवरदेवास पडले महागात ; नाशिक ; ढोल ताशे वाजवून हळदीच्या कार्यक्रमाला कोरोनाच्या काळात गर्दी जमवणे नवरदेवाला चांगलेच महाग पडले आहे. नवरदेव संतोष बुकाने याच्यासह वाजंत्री याना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

५८० ग्रॅमच्या नवजात शिशुला मिळाले जीवदान  : नाशिक येथे सहा महिन्यांच्या गर्भवतीने ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला.आईसह बाळही सुखरूप असून 78 दिवसात त्याचे वजन १६०० ग्रॅम पर्यंत पोहोचले आहे .एवढया कमी वजनाच्या बालकास मिळालेल जीवदान ही उल्लेखनीय घटना असल्याने आनंद व्यक्त होत आहे.