वादग्रस्त आरोग्य भरतीप्रकरणी शासनाविरोधात याचिका ; our nashik teem) सुमारे सहा हजार दोनशे जागांसाठी खासगी संस्थेमार्फत राबविलेल्या आरोग्य भरती विभागाचा सावळा गोंधळ व त्यातील गैरप्रकार या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर आरोग्य भरतीत गैरप्रकार झाले असतानाही नवीन उमेदवाराना थेट नियुक्त्या दिल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सदस्य महेश बाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे