आगामी निवडणुकीचे धेय्य समोर ठेऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न : त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित अत्याचाराचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत त्रिपुरातील घटना निषेधार्थ आहे मात्र त्याआडून काहीं निराश राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत. व समाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल ( ता १५) नाशिक येथे पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले