जीवनाचं गणित कसं कोणाला खरंच कळतच नाही.....नाही दिलं म्हणता ..... ईश्वर असे काही देतो की.....नतमस्तक झाल्याशिवाय कोणी राहत नाही....
काहीसा असा परिचय देणारा माझं जीवन.....माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.......माझं माहेर नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे एक छोट खेड.....वडील हायस्कूल टीचर....आई हाउसवाइफ.....दोन भाऊ एक बहीण असा परिवार.....अत्यंत समृद्ध बालपण....घरातील अगदी मन मोकळं वातावरण......कधी मैत्रिणी कडे जायला विरोध नाही कधी कुठे बाहेर जायला विरोध नाही.....आई-वडिलांचा मुलांवर अत्यंत विश्वास......आणि आम्ही मुले ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल अशाच पद्धतीने वागलो......संपन्न बालपणा साठी नेहमीच आई-वडिलांच्या आम्ही आभार मानतो......माझे शिक्षण एम ए डी एड....डीएड झाल्यानंतर लगेच नोकरी न लागल्याने.....अनेक छोट्या मोठ्या शाळांवर कामे केली...ट्यूशन घेतल्या ब्युटीपार्लर चालवले....शैक्षणिक साहित्य बनवलेले ,डेकोरेशन बनवलेले ,कपड्याचे स्टॉल लावले, नवरीच्या हातावर मेंहदी काढली....स्वतःला बिझी ठेवत गेले.....लग्न खूप उशिरा झाले 2008 मध्ये...सासर नगर जिल्ह्यातील शेवगाव.....परंतु नोकरीनिमित्त नगर येथे पाच वर्षे वास्तव्य होते....परिस्थिती अत्यंत बेताची.... त्याने खूप संघर्ष करावा लागला....शारदा, संगीताची साथ होतीच.....सोबत स्पर्धा परीक्षा देत होते.....2012 साली....सरळ सेवाभरतीने, जलसंपदा विभागात इस्लामपूर , सांगली जिल्ह्यात अनुरेखक या पदावर नियुक्ती मिळाली....आयुष्याला जरा स्थैर्य प्राप्त होतंय न होतं , तोच आई-वडिलांच्या गावी 2019 ला पिंपळगाव बसवंत येथे बदली करून घेतली....आता आई-वडिलां जवळ असते.....डायबिटीस असल्याने थोडेफार तब्येतीच्या तक्रारी असतात......परंतु त्यातूनही वाट काढत अगदी आनंदी जीवन जगते....
माझा गोतावळा समृद्ध अशा देव माणसांनी भरलेला आहे.... त्याने संघर्षातून मी सहज वाट काढू शकले.....बाहेर वावरताना वाईट अनुभव अगदी नगण्य आहेत.....इस्लामपूर कोल्हार येथे एकटे राहण्याची वेळ आली.....सोबत आजूबाजूच्या मैत्रिणी होत्याच.... कोल्हार मध्ये मावशी झोपायला यायची.....पण स्वतःला सगळ्याच पातळीवर जपलं........सर्वात महत्त्वाचं चारित्र्य,संस्कार, माझे छंद.... त्यानेण सगळीकडेच मान-सन्मान कौतुक, आदर प्रेम भरभरून मिळत गेल...... त्यागातल ही सुख मोठ्या समाधानाने उपभोगत आहे.......
ऑफिसचे ठिकाणी सगळीकडे देव माणसं भेटली....लेकीच्या आणि मावशीच्या नात्याचा मी सर्वात जास्त उपभोग घेते.....ऑफिस ची मोठी माणसं मला लेक मानतात...मैत्रिणींची मुलं मावशी म्हणतात....ही सगळी मानतच नाही तर त्या पद्धतीचा आनंद मला देतात.....मैत्री परिवार हिऱ्याची खान आहे.....ढीगभर मित्र-मैत्रिणी आहेत...पण सर्व माझी काळजी करतात....जीव लावतात आणि वेळेला उपयोगीही पडतात.....त्याने अत्यंत समृद्ध असं माझं जीवन आहे.....लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत....माझ्या गोतावळ्यात आहेत....त्यासाठी मी ईश्वरा पुढे नेहमीच नतमस्तक असते......चित्रकला, मेहंदी ,रांगोळी ,कविता, हे छंद मी मोठ्या आवडीने जपते.....बाहेरच्या जगात मी खूप विश्वासाने वावरते.....पूर्वग्रहदूषित ठेवून कधीही कोणाशी मी वागत नाही....मनमोकळेपणाने आणि सरळपणे वागणे मला आवडते......त्याने आत्तापर्यंत मला अविश्वास मिळालेला नाही...परंतु संसारात मात्र मी असफल ठरले.....हेच ते काय माझ्या जीवनाचा अपयश....तरीही नाराज नक्कीच नाही....
जे मिळाले ते खूप समृद्ध करणार आहे.......त्यात तुमच्या सारखे मित्र-मैत्रिणींचे साथ आहे......अध्यात्मिक असल्याने माझ्या सद्गुरु ची सगळ्यात मोठी साथ मला आहे...... त्याने न डगमगता मी मार्गक्रमण करत असते......
मार्च 2021 मध्ये मी टू बीएचके फ्लॅट नाशिक मध्ये घेतला आहे.... २०१८ मध्ये एक सेकंड हॅंड वॅगनार घेतली आहे..... जून मध्ये स्कुटी पेप घेतली आहे.... तिच्यावरच सध्याअपडाउन करते.....
आजच्या या गौरव दिनी मी त्या प्रत्येकाची ऋणी आहे ज्यांनी मला माझ्या संघर्षात साथ दिली माझ्या ओठांवर हसू फुलवल......हे ईश्वरा सगळ्यांनाच तु सुखी ठेव।।।। एवढं व्यक्त होऊन थांबते धन्यवाद!!!!!????????????????