PRANEETA TUKARAM TAPKIRE -CMAHILA AND BALKALYAN VIBHAG) CHILDLINE project ,working since 8 years as a CITY COORDINATOR. CHILDLINE 1098 ,this is National 24 hours working helpline for lost small children.
केलेल्या कामाचा आढावा
१)बालविवाहाच्या अनेक केसेस शासकीय यंत्रणांच्या मदतीने सोडविल्या असून स्वतःच्या संकल्पनेतून बाल विवाह प्रतिबंधासाठी नाशिक शहरातील १०० लॉन्स आणि मंगल कार्यालयात बालविवाह प्रतिबंधक फलक लावण्यात आले. त्यावर बाल विवाह कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षा नमूद करण्यात आली होती.
२) लैंगिक शोषणाच्या अनेक केसेस मध्ये intervention करून नंतर पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली आहे.
३) बालकामगार प्रथेला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याचे काम केले. कामगार विभागासोबत बालकामगार rescue करण्यासाठी धडसत्रात सहभाग.
४) प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात पोलीस आयुक्तालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान या हरवलेल्या मुलांसाठीच्या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवते.
५) डिसेंम्बर २०१५ मध्ये परिमंडळ १ च्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका आणि परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेण्याचे अभियान राबविण्यात आले.. या अभियानाअंतर्गत १२ बाल भिक्षेकऱ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आले आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले..
६) चाईल्डलाईन जनजागृती आणि बालकांचे लैंगिक शोषण यासंदर्भात मुलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून खासगी, मनपा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले.
७) पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार मिळाला आहे.
८) सामाजिक क्षेत्रासाठी देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ मिळाला आहे.
गेल्या 8 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. चाईल्डलाईन या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या प्रकल्पांतर्गत शहर समन्वयक म्हणून काम करत आहे. चाईल्डलाईन १०९८ ही काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठीची राष्ट्रीय २४ तास चालू असणारी, फोन केल्यास तातडीची मदत देणारी सेवा आहे. याअंतर्गत हरवलेली मुले, अत्याचारग्रस्त मुले,पळून गेलेली मुले,वेश्याव्यवसायासाठी आणलेली मुले,बालकामगार,बाल भिकारी,अनाथ-निराधार,वंचित अशा सर्व मुलांसाठी काम करते. चाईल्डलाईन वर आलेल्या कॉल वर दाखल झालेल्या प्रकरणा नुसार केसची पडताळणी केली जाते आणि मुलाला ज्या प्रकारच्या मदतीची गरज आहे त्या प्रकारची मदत केली जाते.
समाजकार्याची पदवी घेतल्यानंतर समाजातील ज्वलंत प्रश्नांची जाणीव झाली आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला हातभार लागेल या उद्दिष्टाने या क्षेत्रात काम करण्याची अभिरुची निर्माण झाली. किशोरवयीन मुलींसाठी, विधवा-परित्यक्ता महिलांसाठी आणि मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम केल्यानंतर लहान मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मुळातच लहान मुलांची आवड असल्याने आवडत्या ग्रुप सोबत काम करायला मिळेल म्हणून हे काम स्वीकारले.
गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळत राहावी. तसेच प्रत्येक मुलाला त्याच निरागस बालपण जगण्याचा अधिकार आहे त्याच्या साठी प्रयत्न करत राहणे.
- के.टी. एच.एम महाविद्यालयातुन मानशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी घेण्याचा विचार करत असतानाच समाजकार्य पदवी बद्दल माहिती मिळाली. सहजच entrance दिली आणि माझे admission झाले. सुरुवातीला विविध सामाजिक संस्थांमध्ये Orientation visits करत असताना विविध समस्यांची जाणीव झाली. त्यामुळे Passout झाल्यानंतर याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
आजचा बालक उद्याच युवक आहे त्यामुळे आजच त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच्या हक्कांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अर्थातच बालकांना बालकामगार, बालभिक्षेकरी, बाल लैंगिक शोषण, बाल विवाह यासारख्या समस्यांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे.
- यश मग ते कोणाचेही असो कोणतेही असो या यशासाठी support महत्वाचा असतो. मला हे काम करण्यासाठी माझे आई वडील सौ.शकुंतला व श्री.तुकाराम यशवंत तपकिरे, माझे मार्गदर्शक प्रा.डॉ. विलास देशमुख, प्रा. सुनिता जगताप, माझे मित्र-मैत्रिणी आणि माझे सर्व चाईल्डलाईनचे सहकारी यांच्या support मुळे हे यश साध्य करता आले आहे
- सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संयम (Patience) महत्वाचा आहे. आज काम केले आणि लगेच यश मिळाले असे नाही. मोठा काळ तुम्हाला यासाठी द्यावा लागतो. तेव्हा संयम ठेवून आपले काम चांगल्या प्रकारे करत रहा यश नक्की मिळेल