रेखाचित्र संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती डोकबाने यांनी घटना दुरुस्ती बैठकीच्या शुभारंभी सादर केलेल्या विद्यमान कार्यकारीणीच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करता प्रस्तुत केलेली कविता लिखीत स्वरुपात सादर . कोल्हापूर आमसभेने इतिहास घडवला
सत्तांतराचा मोठा कौलच दिला
अध्यक्ष महोदयांनी फेटा बांधला
मराठवाड्याचा झेंडा रोवला
कार्यकारिणीचा डंका वाजला
उत्साहाचा ढोल धडाडला
परखड वक्ते , टीकाकार सच्चे
ढवळून निघाले वातावरण सारे
पारदर्शकता , प्रामाणिकपणा अन मेहनतीचे
इंद्रधनु रंग सजले
सभा अन् , दौऱ्यांचा माहौल सजला
शेगावीच्या पहिल्या सभेने मनाचा ठाव घेतला
अन् , संकेतस्थळाच्या अनावरणा ने
डिजिटल क्षेत्रात प्रवेश मिळवला
सगळ्याच सभा विशेष गाजल्या
धुळे यवतमाळ अन चंद्रपूरच्या सभेने मानाचा तुरा खोवला
पश्चिम महाराष्ट्र दौराही झाला
मनामनातील भडास ओकला, झाला सगळा निचरा
कोकण दौर्यात प्रेमाचे पुकार, विश्वासाची वेगळीच साथ
विदर्भ दौरा यशोशिखर ठरला
संस्थापकाचे दिव्य दर्शन दिधला
निरोप हा आगळाच ठरला, साश्रु नयनांनी निरोप घेतला.
औरंगाबाद बैठक सुवर्ण अक्षरातील पान ठरले
घटना दुरुस्तीच्या कामाचे , नजीर शेख सर शिल्पकार ठरले
यशस्वी करत सर्वच टप्पे
सोडवून घेतले अनेक मसले
कैवारी हे सभासदांचे.. नाही भ्रष्ट नेते..
रात्रं दिवस मेहनत, अन् नाही जीवाची परवा
ठेवा सभासदहो याची जाण, ठेवून त्यांचा आदराचा मान
संघटनशक्ती आहे ही नाही खोटी भक्ती
प्रत्येक कार्यासाठी लागते आर्थिक पाठबळाची शक्ती
संघटनेचा असे हा निधी , नाही ही भीक
जाणून संघटनेचे महत्व, समजुन ही रीत
शुद्ध रत्नांची खान येथे, नाही गर्व अभिमानाला स्थान येथे
बहुरंगी कलाकारांच्या भांडारात प्रत्येकाचा सन्मान येथे,
अशीही संघटनशक्ती, शिलेदारांची बळकट काठी
एक रूप अन् एकतेची हीच महाशक्ती.. हीच महाशक्ती !!!!!
स्वाती डोकबाणे नाशिक
Categorey: Poetry
Author: swati Dokbane
Book: Sanghatan Shakti