काय उणे मज देवा
काय उणे मज देवा
जन्म लाखमोलाचा हो
घडवला मानवाला
अति तोलामोलाचा हो
हातपाय दिले देवा
जिव्हा दिली बोलायला
अति बुद्धीमान मेंदू
प्रगतीत चालायला
दिसेनासे मन दिले
भावनांच्या गावा जाण्या
मुखावर हासू दिले
हर्ष दुनियेत येण्या
सुख दिले दु:ख दिले
पेलण्यास बळं दिले
कीती कीती देतो देवा
अन्न, वस्त्र,जळ दिले
आता एक विनवणी
देवा तुजपाशी माझे
'मानवता' दे रे थोडी
कमी कर तुझे ओझे
सौ मनिषा निलेशभंदूरे-खेडगाव
Categorey: Poetry
Author: manisha bhandure
Book: kavita