दिव्यांगांचे दिव्यत्व
स्वाती डोकबाणे ✍
आजचा दिवस माझ्यासाठी संमिश्र भावनांचा ठरला....कारणही तसंच होतं......ऑफिस मध्ये एक काका आले होते.....त्यांना ना हरकत दाखला हवा होता.....त्यानिमित्ताने त्यांच्याशी बोलणं झालं आणि ओघाने त्यांनी माझी विचारपूस केली.....आणि त्या नंतर असे लक्षात आले की त्यांच्या घरात माझ्या एका चुलत चुलत काकांची मुलगी त्यांची वहिनी आहे........त्यांना त्यातून खूप आपलेपणा वाटला....मग त्यांनी माझा फोन नंबर घेतला.....आणि घरी जाऊन त्यांच्या वहिनीला दिला....वहिनीला आपल्या दूरच्या काकांची मुलगी आहे...असं असलं तरी आपली कोणीतरी आहे या भावनेतून तिला खूप आनंद झाला.....ताईचा फोन आला...आणि खूप आपलेपणाने बोलली.....आवर्जून घरी येण्याची विनंती केली.....पिंपळगावात असल्यामुळे......आणि माझा जॉब ही तिथेच......मग दोन तीन दिवसांनी...म्हणजे आजच मी आवर्जून वेळ काढून तिच्याकडे गेले.....गेल्यानंतर सगळ्यांनीच खूप आनंदाने स्वागत केलं ती एकत्र कुटुंबात राहत असल्याने...ताईच्या जावा होत्या, तिच्या पुतण्या होत्या ,तिच्या मुली होत्या.....सर्वांशी ओळख ताई करून देत होती.....त्यात एक गाऊन घातलेली मुलगी स्वच्छ ,निर्मळ, सुंदर अगदी....शांत थोडी गतीमंद माझ्या समोर आली....ताईने ही माझी मोठी मुलगी मोनाआहे म्हणून सांगितलं ...त्यानंतर मात्र मी थक्क झाले...कारण नंतर तिने तिच्या दुसऱ्या मुलीला बोलवलं... सम्राज्ञी....ती समोर येताच धक्का बसला.....दिसायला अतिशय सुंदर ,उंच, गोरीपान.....पण ती पूर्ण अंध.....त्यानंतर ताईने सांगायला सुरुवात केली की....राज्यशास्त्र या विषयातून तिने पदविका घेतलेली होती....नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे...बारावी ती पहिली आलेली होती......सर्व शिक्षण तिच मराठी माध्यमातून झालेलं होतं, सर्वसामान्य मुलांसोबत.....कारण तिला सातवी-आठवी नंतर अंधत्व आलेलं होतं....ना कळत्या वयात अंधत्व आलं असतं तर गोष्ट वेगळी होती.....समजणार्या वयात आलेले अंधत्व कसे बरे स्विकारले असेल ?....कुठल्या कुठल्या भावनेतून हे लेकरू गेले असेल? आणि त्यासोबत तिचे पालक ही .....दोन दिव्यांग मुलींना सांभाळताना त्या आईने जीव कुठे ठेवला असेल?.....उसंत नावाची गोष्ट तर तीने अनुभवलेली नसणारच ..अंधत्व आल्यानंतर आईने वाचून दाखवायचं आणि तिने ऐकून अभ्यास करायचा.....आई आणि मुलीची किती मोठी ही कसरत....इतकेच नव्हे तर हार्मोनियम वादनाच्या सहा परीक्षाही ती उत्तीर्ण होती ......दिव्यत्व पार करून.....मुलीने मोठी मजल गाठली होती...., नावाजलेल्या नाशिक येथील केटीएचएम कॉलेजमध्ये ती असिस्टंट प्राध्यापक म्हणून काम बघत आहे.... कितीही गर्वाची बाब..... नावाप्रमाणेच ती सम्राज्ञी ठरली ...त्यांचें वडील डॉक्टर....१९९६ काळातील तिचे आजोबा वकिल ...काका सिव्हिल इंजिनियर.....बहिण-भावंडे सगळे उच्चशिक्षित.....एकत्र कुटुंब असल्यामुळे......अत्यंत आदराने ,जिव्हाळ्याने ,प्रेमाने मुलींचे संगोपन झालेलं होतं...अंध मुली बद्दल ऐकताना.....माझं हृदय भरून आलं.....डोळ्यातून अश्रू वाहू लागले.....सगळे अवयव ठीक-ठाक असतानाही....नेट-सेट परीक्षा ....उत्तीर्ण होताना नाकीनऊ येतात.....परंतु या मुलीच्या मेहनतीला ,जिद्दीला आणि चिकाटी ला मानाचा मुजरा करावा वाटला .... तिन ते करुन दाखवल होत ....चार बहिण भावंडांन मधली....दोन दिव्यांग मुलींना.....सांभाळणाऱ्या नाहीतर त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी खंबीर साथ देणाऱ्या पालकांनासाठीही नकळत हात जोडले गेले ..... दिव्यांग मुलांना सांभाळताना आई-वडिलांना कुठल्या कुठल्या भावनेतून जावं लागतं याचा अनुभव मी माझ्या घरातच घेत आहे कारण माझे मोठे भाऊ वहिनी दोघेही मूकबधिर आहेत .... त्यांच्यासाठी त्याग भावनेतूनच आई-वडिलांना जीवन कंठावे लागते .....निघताना न राहवून .... त्यांच्याजवळ गेले......डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला ..बहिणीच्या मुली ......म्हणजे मी त्यांची मावशी....त्या ममत्व भावनेतून त्यांच्या पाप्या घेतल्या....त्यावेळी ...त्यांच्या चेहर्यावरील ....ते गोड हास्य....माझ्या हृदयाच्या कुपीत मी साठवून ठेवले.....आणि भावनांच्या कल्लोळातच ....निरोप घेत बाहेर पडले....????
स्वाती डोकबाणे ✍
१८/०१/२०२२
Categorey: Article
Author: स्वाती डोकबाणे
Book: Anubhav