Ournashik Marathi News

Ournashik Marathi News

आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत (New Education Policy) विद्यापीठ अनुदान आयोगाने आता चार वर्षे पदवी अभ्यासक्रम लागू करण्याचा मसुदा तयार केला आहे. यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, दिव्यांगांना शिक्षण, नवसंशोधनाबरोबर बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्याने केवळ पदवीधारक बनू नये, तर कालसुसंगत कौशल्ये त्याच्यामध्ये रुजली पाहिजेत, यादृष्टीनेही आवश्‍यक भर यात देण्यात आला.

 

आयोगाने शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांकडून या मसुद्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. यासाठी येत्या चार एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मसुद्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची रचना देण्यात आली असून, या बदलाची उद्दिष्टेही निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा समग्र बौद्धिक विकासाबरोबर त्याची शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक जडणघडण, त्याच्यातील संवाद कौशल्याचा विकास, तसेच त्याला विविध शाखांचा अभ्यास करण्याची मुभा यात देण्यात आली आहे. (The University Grants Commission drafted a four-year degree course.)

नव्या योजनेअंतर्गत अभ्यासक्रमांसाठी चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम असेल. यात पर्यावरण शिक्षण, समाजसेसवा, मूल्याधिष्ठित शिक्षण या विषयांचे अध्ययन विद्यार्थ्यांना करता येईल. शाश्‍वत विकासाचे संबंधीच्या शिक्षणाचाही यात अंतर्भाव असेल. विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योग, व्यवसाय, कलाकार हस्तकला उद्योग यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. संशोधनासाठी आपल्याच संस्थेत वा अन्य संशोधन संस्थेतही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येईल. यातून विद्यार्थ्याला रोजगारक्षम करण्याचे उद्दिष्ट नव्या धोरणात ठेवण्यात आले आहे.

आजपासून पुढील चार दिवस नाशिकात उष्णतेची लाट तापमान @ ३९.४

नाशिक : उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना नाशिकमध्येही तापमान चाळीशीकडे झुकते आहे. उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत. सोमवारी (ता. २८) कमाल ३९.४, तर किमान तापमान २०.४ अंश नोंदविले गेले. (Heat Wave in Nashik)

गत काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. मार्चच्या अखेरीस तापमान चाळीशीकडे झुकल्याने दिवसभर नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाले होते, मात्र उष्णता वाढली होती. आता पुन्हा तापमान वाढत असून नाशिककर तापले आहेत.

किमान तापमान २४ अंशांच्या वर गेले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विक्रेते हिरव्या नेट चा वापर करताना दिसत आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी टोपी, स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहे. उन्हाची काहिली वाढल्याने नागरिकांनी शीतपेयांना पसंती दिली आहे. ठिकठिकाणी शीतपेये विक्रेते दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहरातील कमाल तापमान

  • सोमवार - ३९.४

  • रविवार - ३८.८

  • शनिवार - ३७.५

  • शुक्रवार - ३७.२

  • Credit and Sources:esakal.com