इयत्ता बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित बदल

इयत्ता बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित बदल

इयत्ता बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित बदल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल २०२२ या वर्षाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित बदल करण्यात आला आहे.

बारावीच्या ५ मार्च आणि ७ मार्च या दिवशी होणार असलेल्या भाषा विषयांच्या परीक्षा ५ एप्रिल आणि ७ एप्रिल रोजी घेण्यात येतील, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.नवीन वेळापत्रकानुसार ५ मार्चची हिंदी तसंच जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन या विषयांची परीक्षा आता ५ एप्रिलला नियोजित वेळेत होईल. ७ मार्चला नियोजित असलेली मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली आणि उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली या विषयांची परीक्षा आता ७ एप्रिल रोजी नियोजित वेळेत होईल. याव्यतिरिक्त इतर परिक्षांच्या तारखा तसंच वेळांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
 
Source and credits:- AIR News