Published by: Ournashik.com
Date: 04-03-2022
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत असून, यासाठी मंडळानं नऊ हजार सहाशे पस्तीस परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत.
विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान या शाखांचे चौदा लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परिक्षेच्या आधी विद्यार्थ्यांच्या शरीराचं तापमान मोजलं जाणार असल्यानं, त्यांना परिक्षेच्या वेळेच्या किमान एक ते दीड तास हजर रहावं लागणार आहे.