Published by: Ournashik.com
Date: 22-02-2022
इयत्ता १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतल्या सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण द्यायचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली.
इयत्ता १० वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी आणि आठवीमधल्या क्रीडास्पर्धेतला सहभाग विचारात घेतला जाईल. तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्षातला क्रीडा स्पर्धेतला सहभाग विचारात घेऊन क्रीडा गुण दिले जातील. तसे निर्देश राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिले असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ही सवलत फक्त सन २०२१-२२ च्या परीक्षेसाठीच दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.